Satish Naikode on Housing Scam: पश्चिम उपनगरात घर देण्याच्या बहाण्याने क्राइम पेट्रोल फेम सतीश नायकोडे (Satish Naykode) यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. त्यांची साधारण 25 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.  आपली फसवणूक झाली असल्याचं कळताच, सतीश नायकोडे हे मागील वर्षभरापासून न्यायासाठी पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवतायेत.  पण त्यांना अद्याप न्याय (Crime News) मिळालेला नाहीये. या काळात त्यांना आपल्या वडिलांनाही गमवावं लागलं. दु:खाचा डोंगर कोसळलेला असताना सतीश नायकोडे खचल्या. त्यांनी आत्महत्या (Crime) करण्याचाही प्रयत्न केला असल्याचं समोर आलं.  दरम्यान एबीपी माझाशी (Abp Majha) बोलताना भावुक होत त्यांनी न्यायाची मागणी केली.  


सतीश नायकोडे यांच्यासोबत नेमकं घडलं काय? (Crime Patrol Actor Satish Naikode on Housing Scam)


सांताक्रुज येथे एसआरए प्रकल्पात घर मिळवून देतो, असं सतीश नायकोडे यांना सांगण्यात आले. अशारित्या ते आस्था प्रॉपर्टीजच्या संपर्कात आले.  आमिष दाखवून सतीश नायकोडे यांच्याकडून जवळपास 25 लाख रुपये उकळण्यात आले. अधिकाऱ्यांच्या सह्या, शिक्के, स्टॅम्प पेपरवर लेखी स्वरूपात या सर्व बाबी झाल्याने सतीश नायकोडे यांचा विश्वास अधिक घट्ट झाला. मात्र यातून त्यांना सध्या केवळ मनस्ताप सहन करावा लागतोय. 


एबीपी माझाशी बोलताना सतीश नायकोडे यांना अश्रु अनावर झाले, ते म्हणाले की, 'कामामुळे मी वेस्टर्न लाइनला राहण्याचा विचार केला होता. लोनवर घर घेण्याचा विचार केला. वडिलांचं घर होतं. स्वत:चं घर घ्यावं असा विचार होता. वेस्टर्न लाइनला घर बघत होतो. सच्चिदानंद बामणे नावाचा व्यक्ती भेटला. त्याने घर दाखवलं.  चाळीतलं घर होतं. मला योग्य आणि बजेटमध्ये होतं. त्याने कागदपत्रे दाखवली.  त्याने काही माणसांशी  ओळख करुन दिली.. सगळं काही योग्य वाटलं. म्हणून मी पैसे दिले', असं सतिश नायकोडे म्हणाले.


'माझ्या अंदाजाने 47 कुटुंब यात अडकले असल्याचा संशय आहे. मी यासंदर्भात तक्रार दाखल करायला पोलीस ठाण्यात गेलो. मी थेट एसआरएकडे गेलो नाही. चाळीतल्या घरातील व्यवहार फिसकटला. त्याने पैसे रिटर्न केले नाही.  तेव्हा त्याने वाकोला येथे दुसरा फ्लॅट दाखवतो, असं सांगितलं. शेवटी पैसे अडकलेत, पैसे मिळत नव्हते, म्हटलं घर तरी दे.. एसआरएचे फ्लॅट दाखवण्यात आले. माझ्यासोबत अनेक कुटुंब होती. पेपर्स, फ्लॅट, सरकारी स्टॅम्प, अधिकाऱ्यांच्या सह्या दाखवण्यात आले.  काही लोक म्हणाली की, आमचं झालं काही दिवसात मिळेल फ्लॅट, आम्हाला विश्वास बसला'.


'त्या लोकांना मी साडे चौवीस लाख दिले.  त्यांनी वर्षोनुवर्षे ताटकळत ठेवलं. शेवटी वांद्रे पोलीस स्टेशन हिल रोडवर गुन्हा दाखल केला आहे. 2025च्या सुरुवातीलाच गुन्हा दाखल केला. न्याय मिळण्यासाठी किती वर्षे लागतील माहित नाही.  दर महिन्याला घराचं खर्च सांभाळून 40-45 हजार हप्ता भरतोय, हा काय विनोदाचा भाग नाही. या काळात माझे वडील गेले. शेवटपर्यंत रडत होते', असं म्हणत सतीश नायकोडे भावुक झाले. 'मी स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. पण मुलांच्या चेहऱ्याकडे पाहिलं, मी पाय मागे घेतला. कलाकारला पेन्शन वैगेरे काही नाही. पण या लोकांनी मला पूर्ण संपवलं आहे', असंही सतीश नायकोडे म्हणाले.


महत्त्वाच्या इतर बातम्या:


त्रिशावरील वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले, पत्नी म्हणाली, 10 मिनिटं थांबा, ते टॉयलेटमध्ये आहेत

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.