Akanksha Chaudhary on Lockupp2: आकांक्षा चौधरी (Akanksha Chaudhary) ही 'लॉक अप 2' (Lock upp2)मधून बाहेर पडली आहे. या शोमध्ये असताना तिने मॉडेलिंग कारकि‍र्दीच्या सुरुवातीच्या काळातील धक्कादायक घटना उघड केली होती. 'लॉक अप 2' च्या घरातून बाहेर पडण्यापूर्वी तिने असा दावा केला होता की,  ब्यूटी पेजेंटमधील एका प्रसिद्ध व्यक्तीने आर्थिक मदतीच्या बदल्यात घाणेरडी मागणी केली. तिने हा खुलासा करताच अनेकांना मोठा धक्का बसला.  


आर्थिक मदतीच्या नावाखाली आकांक्षा चौधरीसमोर घाणेरडी मागणी (Akanksha Chaudhary Alleges She Was Asked for Favours)


'लॉक अप 2' या शोमध्ये तिने मॉडेलिंगच्या दिवसातील धक्कादायक घटना उघड करताना आकांक्षाने सांगितलं की, ती एका ब्यूटी पेजेंटमध्ये भाग घेण्याची तयारी करत होती. पण तिच्याकडे कपडे, ट्रेनिंग आणि इतर खर्चांसाठी पैसे नव्हते. तिनं सांगितलं की, 'कपडे, ट्रेनिंग फीस आणि इतर गोष्टींसाठी  मला साधारण 1-2 लाख रुपयांची गरज होती. मी एका सिनिअर व्यक्तीशी कॉन्टेक्ट केला.   ते स्पर्धकांना   आर्थिक मदत करतात असं ऐकलं होतं'.


 





 


 

 



 

 


View this post on Instagram


 



 

 

 



 

 



 

 

 




 

 


A post shared by Akanksha Choudhary (@akankshachoudhary_official)







आकांक्षाच्या मते,  तिने आर्थिक मदत मागितली, पण त्या बदल्यात तिने काम करण्याची तयारी दर्शवली. पण त्या व्यक्तीने तिला घरी बोलवले.   तिने त्या व्यक्तीला भेटण्याचा निर्णय घेतला. आकांक्षा खुलासा करत म्हणाली की, 'जेव्हा मी गेले होते ते आले.  त्यांनी मला मिठीत घेण्याचा प्रयत्न केला. पण मिठी मारण्याऐवजी मला त्यांनी पुश केलं.  मला त्यांनी पकडलं.  ते खूप व्यस्कर होते. म्हणून मी त्यांचा हात पकडून झटकला'.


आकांक्षाने असा दावा केला की, तिने आर्थिक मदत मागितली होती, पण त्यांनी त्या बदल्यात माझ्यासमोर घाणेरडी आणि चुकीची ऑफर ठेवली.    आकांक्षा म्हणाली की, तो व्यक्ती म्हणाला, 'मी तुला इतके पैसे देत आहे, पण त्याबदल्यात  तुला माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवावे लागतील.  महिनाभरात 5-6 वेळा असं करावं लागेल', असं तिने सांगितलं.  आकांक्षाने तातडीने ती ऑफर नाकारली.   हे ऐकून 'लॉक अप 2'मधील इतर स्पर्धकांना धक्का बसला.


महत्त्वाच्या इतर बातम्या:


Udhayanidhi Stalin on Trisha Krishnan: त्रिशावरील वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले, पत्नी म्हणाली, 10 मिनिटं थांबा, ते टॉयलेटमध्ये आहेत

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.