Pune : पुणेकरांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. पुणे महानगर पालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी याबाबतची माहिती दिली आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा जमा झाल्यामुळं महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणारे सर्व धरणे 100 टक्के भरली आहे. त्यामुळं शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेणाय आला आहे.


 पुणे शहराला पाणीपुरवटा करणारी धरणे 100 टक्के भरली


पुणे जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. विशेषत:धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळं नदी नाले ओढे भरुन वाहिले आहेत. तसेच धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. पुणे शहराला पाणीपुरवटा करणारी धरणे 100 टक्के भरली आहेत.  यामध्ये खडकवासला, पानशेत आणि वरसगाव या धरणांचा समावेश आहे. ही धरणे 100 टक्के भरली आहेत, तर टेमघर धरण हे 98 टक्के भरले आहे. त्यामुळं पुणे महापालिकेने पाणीकपात मागे घेतली आहे. 


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.