Amruta Fadnavis : गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीत सरकारमध्ये फरबदल होण्याची चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) हे देखील दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चा रंगताना दिसत आहेत. अद्याप दिल्लीत सरकारमध्ये कोणतेही फेरबदल झालेले नाहीत. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाण्याच्या चर्चांबाबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला वाटतं की आज वर्तमानामध्ये राहिलं पाहिजे. हितचिंतक बोलत असतात. देवेंद्रजी हे महाराष्ट्राची सेवा करत आहेत. देवेंद्रजी यांची महाराष्ट्र ही कर्मभूमी आहे, त्यामुळं ते इथं चांगलं काम करत असल्याचे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेसच्या अधिकृत अकाउंटवरून अपमानास्पद भाषेचा वापर करण्यात आला आहे. गुंगी गुडिया अशी भाषा वापरल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या घटनेवर देखील अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांना लक्षात आलं पाहिजे त्या सक्षम स्त्री आहेत. त्या अजितदादांच्या मागे उभ्या होत्या, म्हणून दादा समोर येऊ शकले, त्या होत्या म्हणून दादा नाव कमवू शकल्याचे अमृता फडणवीस म्हणाल्या. त्यांना माहिती आहे कुठं बोलायचे कुठं नाही. शांत राहून नेत्यांनी काम करत राहावं असेही अमृता फडणवीस म्हणाल्या. त्यांच्याबाबत काँग्रेसने म्हणणं फारच दुर्दैव आहे, काँग्रेसने माफी मागायला पाहिजे असेही त्या म्हणाल्या. कोण स्टंटबाजी करतंय कोण खरं काम करतं आहे बघितलं पाहिजे असेही ते म्हणाले.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.