Chhatrapati Sambhajinagar Crime News : मोबाईलच्या एका क्लिकवर आणि टेलिग्रामच्या एका ग्रुपवर बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार सुरू होता. धक्कादायक म्हणजे हा रॅकेट चालवणारे कुणी सराईत गुन्हेगार नव्हते, तर बी.कॉम.च्या द्वितीय वर्षात शिकणारे दोन विद्यार्थी होते. छत्रपती संभाजीनगर सायबर पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दीड वर्षांपासून ते टेलिग्रामवरील विविध ग्रुपमधून हा बेकायदेशीर व्यवसाय करत असल्याचा तपासात दावा करण्यात आला आहे. एका फोटोसाठी 5 रुपये, तर एका व्हिडिओसाठी 100 ते 499 रुपये आकारले जात होते. विक्रीतून मिळणारे पैसे थेट बँक खात्यात जमा केले जात होते. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी क्लाऊडवरील डेटा डिलीट करण्याचा प्रयत्न केला, मात्र तांत्रिक तपासात तब्बल 3 हजार 41 संशयित व्हिडिओंचे धागेदोरे समोर आले आहेत. त्यापैकी सुमारे 200 व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले असून, उर्वरित डेटा फॉरेन्सिक तपासातून पुनर्प्राप्त केला जाणार आहे.


विशेष म्हणजे, चार दिवसांपूर्वीच अशाच प्रकारच्या गुन्ह्यात एका विद्यार्थ्याला अटक झाली होती आणि त्याच्यानंतरची ही दुसरी मोठी कारवाई आहे. इंटरनेटचा गैरवापर, झटपट पैशांचा मोह आणि सायबर गुन्हेगारीचं वाढतं जाळं. यामुळे तरुणाई नेमकी कोणत्या दिशेने चालली आहे, हा गंभीर प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.