Actor Pradeep Rawat Passes Away : भारतीय चित्रपटसृष्टीतून एक दुख:द बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि ‘गजनी’ चित्रपटातील मुख्य खलनायक प्रदीप रावत यांचे निधन झाले आहे. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
‘लगान’ चित्रपटातील त्यांचे सहकलाकार यशपाल शर्मा यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्यांच्या निधनाची दुःखद माहिती दिली. ‘महाभारत’ मधील ‘अश्वत्थामा’ ते ‘गजनी’ मधील व्हिलेन अशा विविध भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. मिळालेल्या माहितीनुसार,प्रदिप रावत यांनी कर्करोग झाला होता आणि तो पुन्हा बळावला होता. काही तासांपूर्वीच त्यांचे निधन झाले.ते 74 वर्षांचे होते आणि त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी व मुलगा विक्रमादित्य असा परिवार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते गेल्या एका महिन्याहून अधिक काळापासून रुग्णालयात दाखल होते.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.