Maharashtra SIR News : महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली आहे. बीएलओ आत 17 ऑगस्ट पर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार आहे. याआधी 8 ॉगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र अनेक मोठ्या शहरात मोठ्या प्रमाणावरती एसआयआर बाकी असल्यामुळे ही मुदतवाढ वाढवण्यात आली आहे.
नवीनतम मुदतवाढीमुळे, मसुदा मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची अंतिम तारीख 17 ऑगस्ट 2026 झाली असून, दावे आणि आक्षेप नोंदवण्याचा कालावधी 16 सप्टेंबर 2026 पर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. दावे आणि आक्षेपांची विल्हेवाट 17 ऑगस्ट 2026 ते 15 ऑक्टोबर 2026 या कालावधीत लावली जाईल, आणि हाच कालावधी विसंगतींविरुद्ध नोटिसा बजावण्यासाठी आणि त्यावर सुनावणी घेण्यासाठी देखील असेल. या मोहिमेदरम्यान, बूथ-स्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन पडताळणी करत आहेत, तर अचूक नोंदणी सुनिश्चित करण्यासाठी मतदारांना आवश्यकतेनुसार गणना अर्ज आणि सहाय्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
एसआयआरसाठी पात्रतेची तारीख : 1 ऑक्टोबर 2026
एसआयआर तयारी, प्रशिक्षण आणि छपाई : 20 जून 2026 ते 29 जून 2026
बीएलओ मार्फत घरभेटी : 30 जून ते 29 जुलै 2026
मतदान केंद्रांचं सुसुत्रीकरण (Rationalization) : 29 जुलै 2026
मसूदा मतदार यादीची छपाई : 5 ऑगस्ट 2026
दावे आणि आक्षेप यासाठी मुदत :5 ऑगस्ट 2026 ते 4 सप्टेंबर 2026
दावे आणि आक्षेपांचा निपटारा करणे : 5 ऑगस्ट 2026 ते 3 ऑक्टोबर 2026
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे : 7 ऑक्टोबर 2026
बीएलओची संख्या : 97924
बीएलएची संख्या : 96949
मतदार संख्या : 9,86,64,413
दरम्यान, भारत निवडणूक आयोगाकडून एसआयआरची घोषणा होण्यापूर्वीच महाराष्ट्रात बऱ्यापैकी पूर्वतयारी करण्यात आली आहे. याचा फायदा प्रत्यक्ष एसआयआरच्या कामांदरम्यान होणार आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.