मुंबई : भाजपचे मुंबई (Mumbai) महापालिकेतील नगरसेवक (Nagpursevak) आकाश पुरोहित यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलीय. कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहिल्याने न्यायालयाने त्यांना दणका दिला आहे. कोर्टाच्या तारखेला न आल्याने सत्र न्यायालयाने त्यांना अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. तसेच, आकाश पुरोहित यांचा वॉरंट रद्द करण्याचा अर्ज देखील सत्र न्यायालयाने फेटाळल्याने अखेर आज आकाश पुरोहित यांना अटक करण्यात आली. आता, उद्या 6 जुलै रोजी उच्च न्यायालयात (Court) जामीनासाठी ते अर्ज करणार असल्याची माहिती आहे. सन 2020 मध्ये वीजपुरवठ्याच्या मुद्द्यावरुन केलेल्या आंदोलन प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.
मुंबईत सन 2020 मध्ये वीजपुरवठ्याच्या मुद्द्यावरुन केलेल्या आंदोलन प्रकरणी नगरसेवक आकाश पुरोहित यांना आज अटक करण्यात आली आहे. आंदोलनादरम्यान बेस्टच्या महाव्यवस्थापकाला बेकायदेशीरपणे डांबून ठेवण्यात आल्याचा तसेच पोलिसांना मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंगल प्रभात लोढा यांच्यासह 20 जणांवर आरोप आहेत. आज तपास अधिकाऱ्याची साक्ष नोंदवले जाणार होती आणि आरोपींची ओळख पटविण्यासाठी त्यांची उपस्थिती आवश्यक आहे. मात्र पुरोहित आणि इतर काही आरोपी हजर नसल्याने सुनावणी तहकूब करावी लागली. कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट काढताच पुरोहित आणि इतरांनी कोर्टासमोर हजर होत अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने पुरोहित यांचा अर्ज फेटाळल्याने त्यांना अटक करण्यात आली.
वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे आणि कोर्टाच्या खाली गर्दी असल्यामुळे वेळेत न पोहोचता आल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात केला. याआधी देखील पुरोहित विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते आणि रद्द करण्यासाठी दोन हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आल्याची नोंद घेत न्यायालयाकडून सुनावण्यात आलं. तसेच, आरोपीकडून विलंब करण्याचे डावपेच जाणीवर्वक अवलंबल्याचे सांगत आरोपीची जामिनावर सुटका झाल्यास भविष्यात तो न्यायालयात हजर राहील, अशी कोणतीही शक्यता दिसून येत नसल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. त्यानुसार, आज आरोपीला अटक करण्यात आली असून उद्या जामीन ठेवला जाणार असल्याची माहिती आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.