नवी दिल्ली : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) गेल्या काही दिवसांत देशभरातील खाद्यपदार्थ आणि पेय (Drinks) तयार करणाऱ्या कंपन्यांवर धडक कारवाईचे सत्र सुरू केले आहे. FSSAI च्या या अचानक सुरू झालेल्या छापेमारीमुळे मोठ्या कंपन्यांपासून ते हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि अगदी छोट्या व्यापाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत. आता एफडीए किंवा फसाई केवळ अन्नाची गुणवत्ता तपासण्यापुरती मर्यादित राहिलेली नसून दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, चुकीची लेबलिंग, अस्वच्छता आणि उत्पादनांच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करत आहे.


फसाईने नुकतीच डाबरसारख्या नामांकित ब्रँडवर कारवाई केली असून, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनेक उत्पादनांवर आणि ब्रँड्सवर कडक निर्बंध लादले आहेत.


Reason Behind FSSAI Strictness : फसाई अचानक इतकी आक्रमक का झाली?


FSSAI च्या या कडक कारवाईचा मुख्य उद्देश ग्राहकांची होणारी दिशाभूल थांबवणे आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करून घेणे हा आहे. कोणत्याही उत्पादनाच्या लेबलवर, नावामध्ये किंवा जाहिरातीत अशी कोणतीही चुकीची माहिती नसावी, ज्यामुळे ग्राहकांना त्याच्या गुणवत्तेबद्दल, घटकांबद्दल, शुद्धतेबद्दल किंवा आरोग्याच्या फायद्यांबद्दल गैरसमज निर्माण होईल, असा फसाईचा स्पष्ट नियम आहे.


कंपन्यांना त्यांनी जाहिरातीत केलेल्या दाव्यांचे वैज्ञानिक पुरावे (Scientific Proof) द्यावे लागतील. '100 टक्के मोफत', '100 टक्के प्युअर' किंवा '100 टक्के नॅचरल' अशा शब्दांचा वापर करण्यावर फसाईने बंदी घातली आहे, कारण यामुळे ग्राहक भ्रमित होतात.


FSSAI Action On Dabur India : डाबर इंडियावर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई


FSSAI ने डाबर इंडियाच्या (Dabur India) अनेक प्रमुख उत्पादनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. डाबरचे मध, देशी तूप, ॲपल सायडर व्हिनेगर, व्हर्जिन कोकोनट ऑइल, तीळ तेल, नारळ पाणी आणि नारळाचे दूध यांसारख्या उत्पादनांवर '100 टक्के नॅचरल', '100 टक्के प्युअर' आणि '100 टक्के ऑरगॅनिक' असे दावे लिहिण्यावर फसाईने थेट बंदी घातली आहे. अशा दाव्यांचे योग्य वैज्ञानिक पुरावे देणे कठीण असल्याचे फसाईने स्पष्ट केले आहे.


Fake Ghee Paneer And Oil Raids : बनावट तूप, तेल आणि ॲनालॉग पनीरवर बंदी


जून महिन्यात FSSAI ने बनावट तूप बनवणाऱ्या एका आंतरराज्यीय नेटवर्कचा पर्दाफाश केला होता. दिल्ली आणि हरियाणामध्ये केलेल्या संयुक्त कारवाईत 6,500 लिटरपेक्षा जास्त भेसळयुक्त तूप जप्त करण्यात आले.


महाराष्ट्र : FSSAI ने आणि एफडीएने महाराष्ट्रात मानवी आरोग्यास घातक असणाऱ्या 'ॲनालॉग पनीर'वर (Analog Paneer) बंदी घातली आहे.


बेंगळुरू : हॉटेल आणि खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर वारंवार तेच वापरलेले जुने तेल (Reused Cooking Oil) वापरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे.


Public Health Assurance : जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची गय नाही


नागरिकांच्या आणि ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही लहान-मोठ्या कंपनीला अथवा व्यावसायिकाला अजिबात पाठीशी घातले जाणार नाही, असा सज्जड इशारा FSSAI प्रशासनाने दिला आहे.


ही बातमी वाचा:


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.