सध्या इक्विटी मार्केटमध्ये शेअर्सचा बंद भाव शेवटच्या 30 मिनिटांत झालेल्या एखाद्या शेअरच्या व्यवहार झालेल्या एकूण मूल्याचा एकूण व्यवहारांच्या प्रमाणाशी गुणोत्तरावर (Volume Weighted Average Price (VWAP)आधारित असतो .


ही पद्धत अनेक वर्षे वापरात असली तरी तिच्या काही मर्यादा पुढे आल्या आहेत. व्यवहाराच्या शेवटच्या काही मिनिटांत मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर व्यवहार केल्यास शेअरच्या बंद भावावर त्याचा असमतोल परिणाम होऊ शकतो. निर्देशांक संतुलन (इंडेक्स बॅलन्सिंग) - वायदे  बाजाराच्या  व्यवहाराचा शेवटच्या दिवशी दिवशी ही अस्थिरता आणखी वाढते. त्याचा फटका Passive Funds (ईटीएफ सारखे), Arbitrage Strategies आणि वैयक्तिक गुंतवणूकदारांनाही बसतो. 


ईटीएफ सारखे जागतिक Passive Funds नी याबाबत सेबीकडे चिंता व्यक्त केली होती. इतर प्रमुख बाजारपेठांच्या तुलनेत भारतीय बाजारात दिवसअखेरीस किमतींमध्ये अधिक चढ-उतार होत असल्याने Mutual Funds, ETFs आणि Index Funds च्या कामगिरीवर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. 



या समस्येवर उपाय म्हणून Closing Auction Session (CAS) ही स्वतंत्र व्यवस्था लागू करण्यात येत आहे. अमेरिका, युरोप आणि आशियातील अनेक विकसित बाजारपेठांमध्ये बंद भाव याच पद्धतीने ठरवला जातो.



CAS मध्ये व्यवहाराच्या शेवटी बाजारातील सर्व खरेदी आणि विक्रीच्या ऑर्डर्स एकत्र केल्या जातात. त्यानंतर मागणी आणि पुरवठ्याच्या आधारे सर्वाधिक व्यवहार ज्या किमतीवर होऊ शकतात, त्या भावाला Equilibrium Price म्हणजेच एक  समतोल किंमत निश्चित केली जाते . हाच त्या दिवसाचा बंद भाव ठरतो. त्यामुळे एखाद्या मोठ्या व्यवहाराचा किंमतीत चढ उतार  करण्यास  होणारा परिणाम कमी होतो आणि अधिक पारदर्शक किंमत  (PRICE DISCOVERY) ठरविली जाते .



पहिल्या टप्प्यात CAS जे शेअर वायदे बाजारात व्यवहार कारयास  उपलब्ध आहेतफक्त त्या शेअर्ससाठी लागू होईल. सेबी ही व्यवस्था टप्प्याटप्प्याने लागू करणार आहे. पहिल्या टप्प्यातील  अनुभव  बघून बाकी  शेअर्सचा समावेश केला जाईल. भविष्यात संपूर्ण इक्विटी कॅश सेगमेंटमध्येही ही व्यवस्था लागू होण्याची शक्यता आहे. 



दररोज दुपारी 3.15 ते 3.35 या वेळेत 20 मिनिटांचे स्वतंत्र Closing Auction Session ह्या व्यवहारांसाठी असेल. या कालावधीत प्रथम एक संदर्भ किंमत  (Reference Price) निश्चित केली जाईल. त्यानंतर ऑर्डर नोंदणी , किमतीत बदल किंवा किंमत रद्द करण्याची  ची प्रक्रिया होईल. शेवटच्या टप्प्यात सर्व ऑर्डर्सची जुळवणी करून व्यवहार निश्चित केले जातील. त्यानंतर समाप्तीचे सत्र    (Post Close Session) सुरू होईल. 



CAS मध्ये किंमत ठरवण्याचा आधार एकच असेल मागणी आणि पुरवठा. सर्वाधिक व्यवहार ज्या किमतीवर होऊ शकतात, ती किंमत प्रथम निवडली जाईल. जर अशा एकापेक्षा अधिक किमती असतील, तर ज्या किमतीवर  किंमत असंतुलन (Order Imbalance) सर्वात कमी असेल ती निवडली जाईल. त्यानंतरही एकापेक्षा अधिक पर्याय असतील, तर संदर्भ किंमत  (Reference Price) च्या सर्वात जवळची किंमत निश्चित केली जाईल. 



ETF आणि Index Funds यांना त्यांच्या पोर्टफोलिओचा कामगिरीचा मागोवा घेताना  कमी त्रुटी ठेवण्यासाठी  (Tracking Error) बंद भावावरच  व्यवहार करावे लागतात. आजच्या VWAP पद्धतीमध्ये त्यांना जवळपास 30 मिनिटे बाजारातील किमतींचा कामगिरीचा मागोवा घ्यावा लागतो. CAS लागू झाल्यानंतर ते  लिलावाच्या प्रणाली  मधील प्रमुख सहभागी ठरतील. त्यामुळे बंद भाव  अधिक अचूक आणि पारदर्शक पद्धतीने ठरेल.  भारतीय शेअर्सचे MSCI आणि FTSE सारख्या जागतिक निर्देशांकांमधील वाढते वजन लक्षात घेता, अब्जावधी डॉलरच्या   निर्देशांकाचे पुनर्संतुलन   (Index Rebalancing) व्यवहारांसाठी अशी व्यवस्था अत्यावश्यक ठरत आहे. 



CAS लागू झाल्यानंतरही  वायदे बाजारात  (Equity Derivatives Segment ) मध्ये व्यवहार दुपारी 3.40 पर्यंत सुरू राहतील. यामुळे दुपारी 3.30 वाजता CAS मधून निश्चित झालेला बंद भाव  वायदे  बाजाराला पुढील दहा मिनिटांत त्याची दाखल घेता येईल. त्यामुळे  बाजार भाव किंवा तात्काळ भाव ( Spot Price) आणि  भविष्यातील किंमत (Futures Price) यांच्यातील तफावत कमी होईल. त्याचबरोबर दिवसअखेरीस होणारे तीव्र चढ-उतारही कमी होतील. परिणामी वायदे बाजाराच्या व्यवहार पूर्तीमध्ये  अधिक पारदर्शकता  आणि विश्वासार्हता  येईल. 



CAS दरम्यान गुंतवणूकदारांना  सूचक समतोल किंमत,  (Indicative Equilibrium Price), सूचक व्यापारयोग्य संख्या( Indicative Tradable Quantity), खरेदी-विक्री योग्य संख्या  ( Buy Sell  Quantity) सूचक निर्देशांक Indicative Index यांसारखी माहिती सातत्याने उपलब्ध होईल. त्यामुळे किंमत निश्चितीची  ( Price Discovery) प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल. जोखीम व्यवस्थापनासाठी मार्जिन भरण्याचे   ( Margin Requirement) चे नियमही अधिक काटेकोर करण्यात आले आहेत. उपलब्ध मार्जिन अपुरे असल्यास संबंधित ऑर्डर स्वीकारली जाणार नाही. 



CAS मुळे सुरुवातीच्या काळात Arbitrage Traders ना  म्हणजे जे एका मार्केटमध्ये खरेदी आणि दुसऱ्या मार्केटमध्ये विक्री तसेच   इक्विटी सेगमेंट बाजारात खरेदी आणि वायदे बाजारात विक्री करतात  त्यांना काही बदलांना सामोरे जावे लागू शकते. मात्र, दीर्घकालीन दृष्टीने हा बदल भारतीय भांडवली बाजारासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. दिवसअखेरीस होणारी अनावश्यक अस्थिरता कमी होईल. किंमतींमध्ये कृत्रिम हस्तक्षेपाला आळा बसेल. बंद भाव अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने निश्चित होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय भांडवली बाजार जागतिक मानकांशी अधिक सुसंगत होईल. सेबीच्या मते, हा केवळ तांत्रिक बदल नसून भारतीय बाजाराच्या पुढील उत्क्रांतीतील महत्त्वाचा टप्पा आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.