FDA Action On Dominos Pizza Mumbai : अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएने मुंबईतील बड्या फूड जॉईंट्सवर धडक कारवाईचा बडगा उचलला आहे. अन्न सुरक्षेच्या नियमांचे आणि मानकांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबईतील 'डॉमिनोज पिझ्झा'च्या (Domino's Pizza) 3 प्रमुख आऊटलेट्सचे अन्न व्यवसाय परवाने (Food License) निलंबित करण्यात आले आहेत. एफडीएच्या पथकाने 11 ऑगस्ट रोजी मुंबईतील मॅकडॉनल्ड्स, बर्गर किंग आणि डॉमिनोजसारख्या एकूण 104 खाद्य आस्थापनांवर अचानक धाडी टाकून ही कारवाई केली.


यावेळी व्हेज आणि नॉनव्हेज पिझ्झा तयार करण्यासाठी एकच प्लॅटफॉर्म, टेबल, एकच ओव्हन वापरण्यात येत असल्याचं दिसून आलं. त्याचसोबत त्यासाठी वापरण्यात येणारं तेल हे एक्सपायर झाल्याचं आढळून आलं. त्यामुळे एफडीएने डॉमिनोज पिझ्झाचे तीन आउटलेट्स सील केले. 


Dominos Pizza Suspended Outlets : 'या' 3 डॉमिनोज आऊटलेट्सवर कारवाई


ज्युबिलंट फूडवर्क्स लि. (Jubilant FoodWorks Ltd.) अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या पुढील तीन डॉमिनोज आऊटलेट्सचे परवाने एफडीएने निलंबित केले आहेत:


1. विलेपार्ले (पश्चिम) : एस. व्ही. रोड आणि डी. जे. रोडच्या कोपऱ्यावरील आऊटलेट.
2. बोरिवली (पश्चिम) : आय. सी. कॉलनी, सेंट फ्रान्सिस स्कूल ग्राऊंडसमोर, 'द कॅसल' इमारतीतील आऊटलेट.
3. घाटकोपर (पश्चिम) : आर-सिटी मॉल (R-City Mall), तिसरा मजला, ए-विंग आऊटलेट.


Dominos Pizza  : एफडीएच्या तपासणीत आढळलेल्या गंभीर त्रुटी


अन्न सुरक्षा व मानके विनियम, 2011 च्या परिशिष्ट-४ (Schedule 4) मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.


अस्वच्छता अन् कीटकांचा प्रादुर्भाव : किचन आणि फूड प्रिपरेशन एरियामध्ये प्रचंड अस्वच्छता, तेलकटपणा, उंदरांचा आणि कीटकांचा (Pests/Rodents) वावर आढळला.


तापमान नियंत्रणाचा अभाव : फ्रोझन फूड (Frozen Food) आणि पिझ्झा साहित्याची योग्य तापमानावर साठवणूक व 'टेंपरेचर मॉनिटरिंग' नसणे.


कच्चा-शिजवलेला माल एकत्र : कच्चे-शिजवलेले अन्न आणि शाकाहारी-मांसाहारी घटकांचे योग्य विलगीकरण (Segregation) न करणे. तसेच FIFO/FEFO नियमांचे पालन न करणे.


वैद्यकीय तपासणी अन् कागदपत्रांचा अभाव : कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी, लसीकरण, ग्लोव्हज/ॲप्रनचा वापर न करणे. तसेच पाण्याचे चाचणी अहवाल (Potable Water Testing Reports) व फूड ग्रेड प्रमाणपत्रे नसणे.


इम्प्रोव्हमेंट नोटीसमधील सर्व त्रुटींची पूर्तता करून एफडीएची पुन्हा मंजुरी मिळेपर्यंत या तिन्ही आऊटलेट्सना विक्री अथवा उत्पादन करता येणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


ही बातमी वाचा:


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.