पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक आकिब जावेद यांची मुलगी एका वेगळ्याच कारणावरून सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. उकबा आकिब हीचं लग्न नुकतंच पार पडलं. पण आता तिच्या लग्नाचा विषय चर्चेचा ठरला आहे. पाकिस्तानमध्ये यावरून रणकंदन माजलं आहे. तिच्या फोटोवरून लोकं ट्रोल करत आहे. तसेच फोटोखाली उलटसुलट प्रतिक्रिया देत आहेत. उकबाने बेन क्रिस्टोफोराइड्ससोबत युनाइटेड किंगडममध्ये 9 ऑगस्टला प्रिय प्रेमविवाह केला. या विवाहानंतर आकिब यांची पत्नी फरजाना यांनी सोशल मीडियावर लग्नातील काही फोटो शेअर केले. तसेच फरजान आकिब यांनी उकबा आणि तिच्या पतीला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.”अल्हम्दुलिल्लाह. आमच्या मुलीचे लग्न 9 ऑगस्ट रोजी यूकेमध्ये झाले. हा प्रवास दोन्ही कुटुंबांसाठी आणि हृदयांसाठी आनंदाने भरलेला असो! आमेन.”, असे आशीर्वाद दिले. पण ट्रोलर्सच्या डोक्यात काही भलतंच होतं. त्यांनी उकबाचा फोटो पाहिले आणि ट्रोलिंग करण्यास सुरूवात केली.




फोटो आणि व्हिडीओत आकिब आपल्या मुलीला लग्नस्थळी घेऊन जाताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत उकबाच्या मैत्रिणीही आहेत. तिच्यासह मैत्रिणींनी वेस्टर्न कपडे परिधान केले आहेत. पण पाकिस्तानी ट्रोलर्संना उकबाचा पेहराव काही आवडला नाही. उकबाने हात आणि खांद्यावर टॅटू गोंदल्याने त्यांच्या संतापात आणखी भर पडली. मुस्लिम संस्कृती आणि परंपरांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत पाकिस्तान कट्टरतावाद्यांनी आकिब जावेद आणि त्यांच्या कुटुंबियांना ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.










आकिब जावेदही ट्रोलर्सच्या निशाण्यावर


पाकिस्तानचे हेड कोच आकिब जावेद यांनाही ट्रोलर्संनी निशाण्यावर घेतलं आहे. एका युजर्सने तर पाकिस्तान संघाचे संचालक आणि हेड कोच असूनही धार्मिक संस्कार शिकवले नाहीत का? असा प्रश्न विचारला आहे.




उकबा काय करते?


उकबाचं शिक्षण ब्रिटेनमध्ये झालं आहे. तिने ससेक्स विद्यापीठातून मिडिया आणि आंतरराष्ट्रीय मिडियात पदवी मिळवली आहे. पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती मीडिया, जनसंपर्क, आंतरराष्ट्रीय पत्रकारिता क्षेत्रात व्यावसायिक म्हणून कार्यरत आहे. तिची आई फरजाना आकिब या देखील पाकिस्तानमधील एक नामांकित लेखिका आणि कवी आहेत. त्यामुळे उकबाची कौटुंबिक पार्श्वभूमी ही शैक्षणिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.