पुण्यात आज ओबीसी नेत्यांची पत्रकार परिषद पार पडली. मंगेश ससाणे, लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमरे या ओबीसी नेत्यांनी ही पत्रकार परिषद घेतली. या नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली . त्याचवेळी एक महत्वाची घोषणा केली. येत्या 1 स्प्टेंबरला मुंबईत आंदोलनाची घोषणा केली आहे. “स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बोगस कुणबी प्रमाणपत्र काढून ओबीसींच्या जागा बळकावण्यात आल्या. सर्व ओबीसी नेत्यांच्या जाती काढण्यात आल्या. बावनकुळेंचा खालच्या थराला जाऊन अपमान करण्यात येतोय. जंरागे कुठला कायदा लागू नसल्यासारखे वागतोय. जरांगे सराकारचा बाप आहे म्हणतोय. आमच्या नेत्यांना घाण घाण शिव्या देणं सुरु आहे. अशाच शिव्या आमच्या नेत्यांनी दिल्या तर ? आम्हीही महाराष्ट्रात फिरतोय. येत्या 1 सप्टेंबरला मुंबईत आम्ही आंदोलनाच्या भूमिकेत आलो आहोत. आम्हाला ललकारले जातेय. आम्हाला आव्हान दिले जातेय. येत्या 1 सप्टेंबरला मुंबईत आम्ही आंदोलनाच्या भूमिकेत आलो आहोत. 1 तारखेचे आंदोलन आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत” असं ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी सांगितलं.
“सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी कुठलाही विचार केला नाही. मंगेश ससाणेंनी वास्तव सांगितलं आहे. आम्हाला पोलीस संरक्षण घेऊन फिराव लागतय. आम्ही काय गुंड मवाली आहोत काय? मराठा समाजातील गरीबांसाठी जर ओबींसीचे आरक्षण द्यायचे असेल तर ओबीसीतील गरीबांचे काय? सरकारने संवैधानिक तत्वाला हरताळ फासला आहे. आम्ही हारलो आहोत. अंत्यंत खेदाने नमुद करावे लागते. ओबीसींचे आरक्षण संपले आहे. ओबीसी आरक्षण संपले आहे. त्याची ना सरकारला खंत आहे, ना ओबीसी नेंत्यांना आहे. ओबीसी ही विखुरलेली फेसलेस कम्युनिटी आहे” असं लक्ष्मण हाके म्हणाले.
जरांग्या माकडाने बावनकुळे साहेबांचे व्यंग्य केले
“1 सप्टेंबरच्या आंदोलनापुर्वी लहान बाळाप्रमाणे जरांगे हट्ट धरत आहे, मला चॉकलेट पाहीजे म्हणजे पाहीजे. सरकार ते मान्य करते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की ओबीसी आमचा डीएनए आहे. ओबीसींना वाटले की कुणीतरी आमच्या बाजूने बोलणारे आहे. भुजबळ साहेब, मुंडे बंधू भगिनी, बावनकुळे साहेबांवर बोलणं सुरु झाले. आता त्या जरांग्या माकडाने बावनकुळे साहेबांचे व्यंग्य केले. मी ही मराठवाड्यातील आहे. जरांगेंनी लक्षात ठेवावे की ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी. गावगाड्यात आमच्या गाड्या फोडल्या जातायेत. आम्हाल धमकावलं जातंय. आमचे मंत्री, आमदार झोपले असतील, घाबरले असतील पण ओबीसी समाज झोपलेला नाहीए. पत्रकारांना विनंती आहे त्याच्या नावापुढे पाटील लावू नका” असं नवनाथ वाघमारे म्हणाले.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.