नागपंचमीचा सण हा श्रावण शुक्ल पंचमीला साजरा केला जातो. यादिवशी नागाची पूजा केली जाते. गावाकडे तर अजूनही नागाच्या वारुळावर जाऊन प्रत्यक्ष नागाची पूजा देखील केली जाते. मात्र शहरात नागाच्या पूजेवर बंदी असल्याने महिला घरातच पाटावर नागाची आकृती बनवून किंवा फोटोची पूजा करतात. यंदा 2026 मध्ये नागपंचमी केव्हा आहे व पूजेचा शुभ मुहूर्त आणि विधी हे सर्व काही जाणून घेऊयात.


नाग पंचमी 2026 कधी ?


हिंदू पंचांगानुसार श्रावण शुक्ल पक्षाची पंचमी तिथी 16 ऑगस्ट रविवारी सायंकाळी 4:52 वाजता सुरु होईल व 17 ऑगस्ट सोमवार रोजी सायंकाळी 5:00 वाजता संपेल. त्यामुळे यंदा नागपंचमी ही 17ऑगस्ट रोजी साजरी करण्यात येईल.


पूजा विधी –



  • सकाळी स्थान करून महादेवाचे स्मरण करावे आणि अभिषेक करावा.

  • त्यानंतर बेलपत्र, जल अर्पण करावे.

  • काही जण पाटावर नागाची मूर्ती स्थापित करून पूजा करतात तर काही ठिकाणी चित्र काढून पूजा करतात.

  • तुम्ही तुमच्या पूर्वापार चालत असलेल्या पद्धतीने मांडणी करून पूजा करावी.

  • नागाची स्थापना केल्यानंतर देवतेला अक्षता, दही, गंध, फुले, मोदक अर्पण करावेत.


नागपंचमीचे महत्त्व –


नागपंचमीचा दिवस कालसर्प योग आणि ग्रहपिडा यापासून मुक्त होण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो, असे म्हणतात की नाग पंचमीला नागाची पूजा केल्याने सर्व दोषातून मुक्ती होते. या दिवशी रुद्राभिषेक करणे देखील आहे.


नागाची आठ रुपे –


नागपंचमीच्या दिवशी अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कुलीर, कर्कट, शंख या नागांच्या आठ रूपांची पूजा केली जाते.


हेही वाचा – श्रावणात हे दान मानले जाते सर्वात श्रेष्ठ











Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.