Mumbai Crime Navy Sailor Family death: संपूर्ण देशात शनिवारी भारताचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जात असताना दक्षिण मुंबईच्या कुलाबा (colaba) परिसरात असणाऱ्या नेव्ही नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नेव्ही नगरमधील कॉलनीत (Navy colony) वास्तव्याला असणाऱ्या एका कर्मचाऱ्याने आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे नेव्ही नगरमध्ये खळबळ उडाली आहे. (Maharashtra Crime news)


प्राथमिक माहितीनुसार, मुंबईतील नेव्ही नगर, कुलाबा परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. भारतीय नौदलातील एका कर्मचाऱ्यासह त्यांची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. 15 ऑगस्ट रोजी हे चौघेही त्यांच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळून आले. यापैकी नौदल कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. तर त्याची पत्नी आणि दोन लहान मुले यांच्यावर विषप्रयोग झाल्याचा संशय आहे. पोलिसांनी या चौघांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले होते. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन पुढील तपास सुरु केला आहे.  आता या चौघांच्या शवविच्छेदनाच्या अहवालात आणखी काही वेगळी माहिती समोर येणार का, हे बघावे लागेल. नौदलाच्या कर्मचाऱ्याने आपल्या पत्नी आणि मुलांना विष देऊन मारल्यानंतर आत्महत्या केली, असावी असा अंदाज आहे. मात्र, त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. 


नौदल कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा संशय आहे. तर पत्नी आणि दोन मुलांच्या मृत्यूची परिस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. मृत मुलांपैकी एकाचं वय अवघं दोन महिने, तर दुसऱ्या मुलाचं वय सुमारे तीन वर्षे असल्याची माहिती आहे. प्राथमिक तपासात पत्नी आणि मुलांच्या मृत्यूमागे विषबाधेची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. सध्या चौघांच्याही मृतदेहांची शवविच्छेदन प्रक्रिया सुरू असून, त्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा पोलीस आणि भारतीय नौदलाकडून संयुक्तपणे तपास सुरू आहे. मृत्यूमागचं नेमकं कारण आणि घटनाक्रम शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.


Indian Navy: भारतीय नौदलाचं निवेदन 


“नेव्ही नगर, कुलाबा येथे 15 ऑगस्ट रोजी भारतीय नौदलातील एका नौसैनिकासह त्यांची पत्नी आणि दोन मुले त्यांच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळून आली. या घटनेचा पोलीस तपास सुरू असून, भारतीय नौदलाकडून तपासासाठी सर्वतोपरी मदत केली जात आहे.”, असे निवेदन भारतीय नौदलाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.


आणखी वाचा



Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.