Sunny Deol Reaction Pan Masala Gutkha Ads: पान मसाल्याची (Pan Masala) एक जाहिरात (Pan Masala Advertise) केल्यामुळे बॉलिवूड अभिनेते (Bollywood Actors) शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणींत वाढ झालीय. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनानं (FDA) या तिन्ही अभिनेत्यांना पान मसाल्याच्या जाहिरातीसंदर्भात 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये (Bollywood News) खळबळ माजली आहे. अशातच बॉलिवूडचा दमदार अभिनेता सनी देओलनं (Actor Sunny Deol) पान मसाल्याच्या जाहीरातींबाबत केलेलं एक वक्तव्य भलतंच चर्चेत आलं आहे.
बॉलिवूड अभिनेता सनी देओलनं पान मसाल्यांच्या जाहीरातींवर भाष्य केलंय. ज्या उत्पादनांवर आपला विश्वास नाही, त्यांचा प्रचार करण्याची आपली इच्छा नाही, असं त्यानं स्पष्ट केलं आहे. ज्या उत्पादनांचं आपण स्वतः समर्थन करत नाही, त्यांची जाहिरात करण्यास आपली सदसद्विवेकबुद्धी परवानगी देत नाही, त्यामुळेच आपण अशा ऑफर्स नाकारल्याचं सनी देओलनं यावेळी बोलताना सांगितलं आहे.
पान मसाल्यांच्या जाहीरातींवर बोलताना सनी देओल नेमकं काय म्हणाला? (Sunny Deol On Pan Masala Advertise)
सध्या अभिनेता सनी देओल 'बंटवारा 1947' या त्याच्या सिनेमामुळे चर्चेत आहे. याच निमित्तानं तो शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टवर मुलाखतीसाठी उपस्थित होता. यावेळी अभिनेत्याला विचारण्यात आलं की, तो पान मसाल्यांच्या जाहिरातींमध्ये का काम करत नाही? यावर बोलताना सनी देओलनं उत्तर दिलं की, "मी पान मसाल्याच्या जाहिराती करत नाही आणि कधीच करणार नाही... मी अशा प्रकारचं कोणतेही काम करणार नाही... मला अशा जाहिरातींच्या ऑफर्स येतात, पण मी त्या स्वीकारत नाही... ज्या गोष्टींवर माझा विश्वास नाही, त्या गोष्टी मला करायच्या नाहीत. या गोष्टींचं मी समर्थन करत नाही. त्यांचा प्रचार करणं मला योग्य वाटत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या मी करत नाही, कारण माझी सदसद्विवेकबुद्धी मला त्याची परवानगी देत नाही, मी केवळ त्या गोष्टी करतो, ज्या मला योग्य वाटतात...", असं सनी देओल म्हणाला.
याव्यतिरिक्त, सनी देओलला जाहिरातींमध्ये काम करण्याबाबतच्या त्याच्या सर्वसाधारण भूमिकेबद्दलही विचारण्यात आलं. या संभाषणादरम्यान अमिताभ बच्चन, शाहरुख खान, हृतिक रोशन आणि अजय देवगण यांसारख्या अनेक जाहिरातींमध्ये झळकलेल्या बड्या कलाकारांचाही उल्लेख करण्यात आला.
यावर बोलताना सनी देओल म्हणाला की, "मी भारताचं प्रतिनिधित्व करतो आणि त्यासोबत येणाऱ्या सर्व गोष्टींचंही... काही कारणास्तव मला जाहिरातींच्या ऑफर्स मिळत नाहीत. त्या ऑफर्स माझ्याकडे का येत नाहीत? याची मला काहीच कल्पना नाही... ज्याप्रमाणे मला सुरुवातीच्या काळात सिनेमांच्या ऑफर्स मिळत नव्हत्या, तसेच जाहिरातींच्या बाबतीतही मला काहीच समजत नाहीये; त्याबद्दल मी पूर्णपणे अनभिज्ञ आहे..."
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.