पुणे: पुण्यातील एआरएआय (ARAI) म्हणजेच वेताळ टेकडीवर बुधवारी मध्यरात्री एका अल्पवयीन तरुणाची त्याच्याच मित्रांनी डोक्यात हातोडी मारून निर्घृण हत्या (Pune Crime News) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. "विरोधी पार्टीचे स्टेटस" मोबाईलवर ठेवल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे निष्पन्न झाले असून, कोथरूड पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.(Pune Crime News)


Pune Crime News:  नेमकी घटना काय?


मयत तरुण आणि ताब्यात घेतलेले दोन्ही आरोपी हे विधीसंघर्षित (अल्पवयीन) असून त्यांचे वय १७ वर्षे आहे. हे तिघेही कोथरूड भागातील श्रावणधारा सोसायटी परिसरातील रहिवासी असून गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांचे मित्र होते. मयत तरुण हा बारावीत शिकत होता, तर आरोपींपैकी एक जण बारावीत शिकत असून दुसरा कोणताही कामधंदा करत नाही.(Pune Crime News)


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी एका आरोपीचे त्याच्या विरोधकांशी कशावरून तरी भांडण झाले होते. या भांडणाबाबत या तिघांमध्ये चर्चाही झाली होती. मात्र, मयत तरुण वारंवार आरोपींच्या विरोधकांच्या बाजूने मोबाईलवर "स्टेटस" ठेवत असे. "तू त्यांचा स्टेटस नको ठेवत जाऊ," असे एका आरोपीने त्याला अनेकदा बजावले होते. तरीही तो स्टेटस ठेवत असल्याने आरोपींच्या मनात त्याचा राग निर्माण झाला होता.


Pune Crime News: राजगडवरून परतताना रचला कट


याच रागातून दोघांनी मिळून आपल्याच मित्राचा काटा काढण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी त्याला राजगड येथे फिरायला जाण्याचा आग्रह केला. मंगळवारी हे तिघेही राजगडावर फिरायला गेले. रात्री उशिरा पुण्यात परतल्यानंतर दोन्ही आरोपी त्याला वेताळ टेकडीवर घेऊन गेले. तिथे मध्यरात्रीच्या सुमारास निर्मनुष्य ठिकाणी त्यांनी त्याच्या डोक्यात हातोडीने जोरदार वार केले. गंभीर वार झाल्यामुळे तो तरुण रक्ताच्या थारोळ्यात तिथेच कोसळला. मित्राचा खून केल्यानंतर दोन्ही आरोपींनी तिथून पोबारा केला.


Pune Crime News:  पोलीस तपास व कारवाई


बुधवारी सकाळी टेकडीवर फिरायला गेलेल्या नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या (Technical Analysis) आधारे कोथरूड पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. मयत तरुणाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणी पुढील सखोल तपास करत आहेत.


 


 


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.