ऑनलाइन शॉपिंगमुळे घरबसल्या कपड्यांपासून किराणा, कॉस्मेटिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत जवळपास सगळंच खरेदी करता येतं. पण ऑफर आहे, आजची लास्ट डेट किंवा आता नाही घेतलं तर मिळणार नाही अशा मेसेजमुळे आपण गरज नसतानाही वस्तू कार्टमध्ये टाकतो. काही दिवसांनी ती वस्तू न वापरता पडून राहते आणि लक्षात येतं पैसे तर खर्च झाले, पण खरंच गरज होती का? असं होता काम नये म्हणून ऑनलाइन ऑर्डर करण्याआधी फक्त दोन मिनिटं थांबून स्वतःला हे प्रश्न नक्की विचारा.
1) ही वस्तू सध्या आवश्यक आहे की फक्त फोटो पाहून आवडली?
2) माझ्याकडे यासारखी वस्तू आधीच आहे का?
3) मी ही वस्तू किती वेळा वापरेन? तिची किंमत आणि उपयोग यांचा विचार करा.
4) डिस्काउंट नसता तरी मी हे घेतलं असतं का? कारण अनेकदा ऑफर पाहून आपण वस्तूची गरज निर्माण करतो.
5) प्रॉडक्ट व्यतिरिक्त डिलिव्हरी चार्ज, टॅक्स अतिरिक्त फी पकडून अंतिम किंमत किती आहे?
6) रिव्ह्यू आणि रिटर्न पॉलिसी तपासली आहे का?
पुढच्या वेळी Buy Now बटण दाबण्याआधी हे प्रश्न स्वतःला विचारा. कदाचित तुमच्या कार्टमधली एखादी वस्तू कमी होईल आणि महिन्याच्या शेवटी वॉलेटमधले पैसे नक्कीच जास्त उरतील.