बातमी शेअर करा :


































सामनाचे अनुसरण करा






कंधार तालुक्यातील मराशिवणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शालेय पोषण आहार, मध्यान्ह भोजनाच्या वेळी मुख्याध्यापक व शाळेतील शिक्षक यांना शिजवलेल्या खिचडीमधील सोयावडीमध्ये आळ्या असल्याचे निदर्शनास आणून दिले. परंतु, मुख्याध्यापक यांनी चक्क मुलांना खिचडीमधील आळ्या असलेली सोयाबीन वडी काढून खाण्यास सांगितले. त्यामुळे विद्याथ्यांनीही ती आळ्या असलेली खिचडी खाल्ली, परंतु विद्यार्थी गप्प न बसता गावात जाऊन दिसेल त्या गावकऱ्यांना सांगून शाळेत घेऊन गेले व त्यांनी ही खळबळ जनक घटना उघड केली.


तालुक्यातील मराशिवणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत २२ रोजी दुपारच्या वेळी शालेय पोषण आहारातील मध्यान्ह भोजन चालू होते. दररोजच्याप्रमाणे विद्यार्थी जेवण करण्यास बसले. मध्यान्ह भोजनाच्या मेनुमध्ये आज खिचडी केली होती. खिचडी विद्यार्थ्यांना वाटप केली. ती खिचडी मुले आनंदाने खात होते. तेवढ्यात एका मुलाने खिचडीच्या सोयावडीमध्ये आळ्या असल्याचे इतर मुलांना दाखवले व मुख्याध्यापक यांनाही सांगितले. परंतु मुख्याध्यापक यांनी मुलांना त्याला काही होत नाही. सोयावडी काढून खा, असे सांगितले.


बिचारे लहान मुले, मुलांनी गुपचुप समोरची खिचडी खाल्ली, परंतु त्यांना न राहिल्याने त्यांनी गावामध्ये जे कोणी दिसेल त्यांना शाळेतील खिचडीतील त्या आळ्या असलेल्या सोयावडी हातात घेऊन त्यामधील आळ्या दाखवू लागले.


गावकऱ्यांची मागितली माफी


याबाबत मुख्याध्यापक यांच्याशी चौकशी करत असताना त्यांनीसुद्धा खिचडीतील सोयावडीमध्ये आळ्या निघाल्याचे विद्यार्थी यांनी सांगितल्यावर त्यांना मी सोयावडी काढून खाण्याचा सल्ला दिल्याचे त्यांनी कबूल केले. उपस्थित गावकऱ्यांची त्यांनी माफी मागून परत असा प्रकार घडणार नाही, याची शाश्वती दिली.







Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.