Romantic webseries Suggestions:  ओटीटीवर सध्या अनेक प्रकारचा कंटेंट येत असतो.  अनेकांना रॉमकॉम जॉनरच्या वेब सिरीज पाहायला आवडतात. अशातच OTT वर आलेली मुसाफिर कॅफे सिरीज अनेकांना आवडली. ‘मुसाफिर कॅफे’ सीझन 2 ची (Musafir Cafe) अधिकृत घोषणा Netflix कडून झाल्यामुळे रोमँटिक आणि भावनिक कथांचा आनंद घेणाऱ्या प्रेक्षकांसाठी ही अगदी योग्य वेळ आहे. प्रेम, विरह, मैत्री, सहवास आणि नात्यांमधील गुंतागुंत यांचा सुंदर मिलाफ असलेल्या या भारतीय वेब सीरिज तुम्हाला नक्कीच भावतील. ‘मुसाफिर कॅफे’च्या दुसऱ्या सीझनची वाट पाहताना या 5 सीरिज नक्की ट्राय करा.


मॉर्डन लव्ह मुंबई (Amazon Prime Video)


New York Timesच्या लोकप्रिय कॉलमवर आधारित मॉर्डन लव्ह मुंबई‘(Modern Love Mumbai) ही रोमँटिक अँथॉलॉजी सीरिज आहे. मुंबईच्या गजबजलेल्या आणि रंगीबेरंगी पार्श्वभूमीवर प्रेमाची वेगवेगळी रूपं या सीरिजमध्ये पाहायला मिळतात. वैवाहिक नातं असो, स्वतःवरचं प्रेम, मैत्री, आकर्षण किंवा कुटुंबातील नात्यांची गुंतागुंत… प्रेमाच्या प्रत्येक छटेला या सीरिजमध्ये हळुवारपणे स्पर्श केला आहे. फातिमा सना शेख, प्रतीक गांधी, चित्रांगदा सिंग, अर्शद वारसी, वामिका गब्बी आणि मसाबा गुप्ता यांसारख्या कलाकारांच्या अभिनयामुळे ही सीरिज आणखी खास बनते.


लिटल थिंग्ज (Netflix)


मुंबईत एकत्र आयुष्य जगणाऱ्या काव्या आणि ध्रुवची ही गोष्ट म्हणजे रोजच्या छोट्या-छोट्या क्षणांमधून फुलणारं प्रेम. मिथिला पालकर आणि ध्रुव सहगल यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सीरिजचे चार सीझन आहेत. नात्यातील प्रेमासोबतच करिअर, कुटुंब, लग्न, भविष्य आणि एकमेकांना समजून घेण्याचा प्रवास या सीरिजमध्ये अगदी सहजपणे दाखवला आहे.मोठमोठ्या ड्रामापेक्षा नात्यातील छोट्या क्षणांमध्ये आनंद शोधणाऱ्या कथा आवडत असतील, तर ‘Little Things’ तुमच्यासाठी परफेक्ट आहे.


ब्रोकन बट ब्युटिफूल (Amazon Prime Video)


काही नाती आपल्याला तोडून जातात, तर काही माणसं आपल्याला पुन्हा स्वतःवर प्रेम करायला शिकवतात. ‘ब्रोकन बट ब्युटिफूल'ची (Broken But Beautiful) गोष्ट याच भावनेभोवती फिरते. विक्रांत मॅसी आणि हरलीन सेठी यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही रोमँटिक ड्रामा सीरिज दोन  तुटलेल्या मनांच्या व्यक्तींची कथा आहे. वीर आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर अपराधीपणाच्या भावनेत अडकलेला असतो, तर समीरा एका Toxic नात्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते.दोघांची भेट होते आणि दोघांमधल्या सारख्या वेदना हळूहळू त्यांना एकमेकांच्या जवळ आणते. कधी कधी आयुष्यात प्रेम पुन्हा येतं… पण ते आधीच्या प्रेमासारखं नसतं, हे ही सीरिज सुंदरपणे दाखवते.


मिसमॅच ( Netflix)


तरुणाई, प्रेम, करिअर, मैत्री आणि नात्यांमधील गोंधळ यांचं भन्नाट मिश्रण म्हणजे ‘Mismatched’.प्राजक्ता कोळीची डिंपल ही करिअरवर लक्ष केंद्रित करणारी टेक प्रोफेशनल आहे, तर रोहित सराफचा ऋषी हा प्रेमावर मनापासून विश्वास ठेवणारा रोमँटिक मुलगा आहे. मॅट्रिमोनियल वेबसाइटवर डिंपलचा प्रोफाइल पाहिल्यानंतर ऋषी तिच्या आयुष्यात येतो. जयपूरमधील कोडिंग प्रोग्राममध्ये दोघांची भेट होते आणि एका प्रोजेक्टवर एकत्र काम करताना त्यांच्यातील नातं हळूहळू बदलत जातं. प्रेमासोबतच स्वतःची स्वप्नं आणि करिअर जपण्याची धडपडही या सीरिजमध्ये पाहायला मिळते.


परमनंट रूममेटस (Amazon Prime Video)


तीन वर्षांचं लॉन्ग-डिस्टन्स रिलेशनशिप…आता एकत्र राहण्याची वेळ येते.. ‘Permanent Roommates’ची सुरुवातच या मजेशीर परिस्थितीपासून होते. तान्या आणि मिकेश एकत्र राहायला सुरुवात करतात आणि त्यानंतर सुरू होतो प्रेम, भांडणं, गैरसमज, कुटुंबीयांचा दबाव आणि एकमेकांना समजून घेण्याचा भन्नाट प्रवास आहे. निधी सिंग आणि सुमीत व्यास यांच्या सहजसुंदर अभिनयामुळे ही रोमँटिक कॉमेडी आणखी मजेशीर होते. हसवतानाच नात्यातील छोट्या-छोट्या अडचणी आणि प्रेमाची खरी परीक्षा काय असते, हेही ही सीरिज दाखवते. ‘मुसाफिर कॅफे’ सीझन 2 येईपर्यंतचा वेळ अशाच प्रेमळ, हलक्याफुलक्या आणि भावनिक कथांसोबत घालवायचा असेल, तर या 5 वेब सीरिज तुमच्या वॉचलिस्टमध्ये नक्की ठेवा.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.