बातमी शेअर करा :


































सामनाचे अनुसरण करा






अलिबागच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन काही दिवसांपासून बंद असून रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णांना सिटी स्कॅनसाठी वडखळ किंवा नवी मुंबईतील रुग्णालयांमध्ये जावे लागत आहे. यामुळे रुग्णांचा प्रवासात वेळ वाया जाण्यासोबत आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे.


अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध आजारांवर उपचार करून घेण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने रुग्ण येतात. मात्र जिल्हा रुग्णालयात अनेक सोयी सुविधांचा अभाव आहे. सद्यस्थितीत रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन बंद असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. अपघातग्रस्त व अन्य रुग्णांना तातडीने सिटी स्कॅनमार्फत आजाराचे निदान व्हावे यासाठी रुग्णालयात सिटी स्कॅन मशीन उपलब्ध करण्यात आले होते. मात्र तांत्रिक बिघाडामुळे मशीन वारंवार बंद पडत असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. दरम्यान मशीनच्या देखभालीबाबत ज्या कंपनीसोबत करार आहे त्यांचे तंत्रज्ञ येऊन लवकरच मशीन सुरू करतील, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.







Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.