हँडग्रेनेड अन् हिजबुल मुजाहिदीनची पोस्टर्स हस्तगत : पुलवामातही 2 दहशतवादी ताब्यात


वृत्तसंस्था/ श्रीनगर


जम्मू-काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात सुरक्षा दलांनी सोमवारी रात्री उशिरा तपासणीदरम्यान 6 दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दहशतवाद्यांकडून 2 हँडग्रेनेड आणि हिजबुल मुजाहिदीनची पोस्टर्स हस्तगत करण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये कुलगामचे रहिवासी जुनैद अहमद डार, आमिर युसूफ आणि जुनैद मुजफ्फरचा समावेश आहे. तर हस्तगत सामग्रीवरून चौकशी सुरू करण्यात आली आहे.


पुलवामा येथे देखील सुरक्षा दलांनी यरवान जंगलात शोधमोहीम राबवून दोन दहशतवाद्यांना पकडले आहे. लतीफ अहमद दीदाद आणि एजाज अहमद बजाद अशी त्यांची नावे आहेत. या दहशतवाद्यांकडून एक पिस्तुल, 12 काडतुसे आणि हँडग्रेनेड हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांच्याविरोधात शस्त्रास्त्र कायदा आणि युएपीएच्या अंतर्गत गुन्हे नोंदविले आहेत. तर सुरक्षा यंत्रणा शस्त्रास्त्रांचा स्रोत आणि दोघांच्या दहशतवादी नेटवर्कसोबतच्या संबंधांची चौकशी करत आहेत.


सोपोरमध्येही यश


यापूवी सोपोरच्या मंजसीर भागात सोमवारी रात्री सुरक्षा दलांनी संयुक्त शोधमोहिमेत शस्त्रास्त्रs हस्तगत केली. एका घराच्या झडतीदरम्यान एके-47 रायफल, 3 मॅगजीन, 72 काडतुसे, 4 हँडग्रेनेड आणि एक आयईडी हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी आता सुरक्षा यंत्रणा अधिक तपास करत आहेत.


 


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.