शिवसेनेला मतदान करून निवडून दिलेल्या नगरसेवकांनी पैशांसाठी मिंधे गटात प्रवेश केल्याने संतप्त झालेल्या मतदारांनी नगरसेवकांच्या घरासमोर ‘एक खोका, मतदाराला धोका’ असे बॅनर लावले आहेत.
शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी मिंधे गटात प्रवेश केल्याने धाराशिवमध्ये हे पोस्टर झळकले आहे. याचाच राग म्हणून नगरसेवकांच्या घरासमोर मतदारांनी बॅनर झळकावले आहेत. धाराशिव शहरातील समता कॉलनीमध्ये नगरसेवक संतोष घाडगे यांच्या घरासमोर संतप्त आशयाचे बॅनर झळकले आहेत. ‘एक खोका, मतदाराला धोका’ या आशयासह इतर आरोप या बॅनरवर करण्यात आले आहेत. पक्षांतराचा निषेध करत या बॅनरमधून मतदारांनी आपला संताप व्यक्त केला आहे. ‘आमचे मत आम्हाला परत द्या’, ‘एक खोका, मतदाराला धोका’, ‘हा शिक्का पुसला जाणार नाही’, ‘एक कोटीचा गद्दार’ असा मजकूर बॅनरवर झळकत आहेत.