Samrudhi Mahamarg Robbery : समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील मलढोण व दुशिंगपूर शिवारात (चॅनेल क्रमांक ५३८ ते ५४३ दरम्यान) गुरुवारी मध्यरात्री दरोडेखोरांच्या टोळक्याने (Samrudhi Mahamarg Robbery) भयंकर थरार घडवून आणला. लुटारूंनी धावत्या वाहनांच्या मार्गात खिळे व धारदार लोखंडी वस्तू टाकून टायर पंक्चर केले आणि लाखो रुपयांची (Samrudhi Mahamarg Robbery) लुटालूट केली. दीड तासांहून अधिक काळ चाललेल्या या महामार्गावरील धुमाकूळात ३ वाहनांना लक्ष्य करण्यात आले असून वावी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Samrudhi Mahamarg Robbery)


Samrudhi Mahamarg Robbery :  कुटुंबाला मारहाण, १८ लाखांचा ऐवज लांबवला


गुरूवारी मध्यरात्री १२:०० च्या सुमारास छत्रपती संभाजीनगर येथील एक कुटुंब कारने मुंबईच्या दिशेने जात होते. रस्त्यावर टाकलेल्या लोखंडी वस्तूंमुळे कारचे टायर फुटले. गाडी थांबताच दबा धरून बसलेल्या १० ते १२ जणांच्या टोळक्याने वाहनाला चारी बाजूंनी वेढा घातला. लुटारूंनी लोखंडी रॉड आणि दांडक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली व वाहनातील लहान मुलांना बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. या भीषण दहशतीमुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी अंगावरील सोन्याचे दागिने, घड्याळे आणि ८४ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम असा एकूण १८ लाख ९ हजार ५०० रुपयांचा ऐवज दरोडेखोरांच्या स्वाधीन केला.(Samrudhi Mahamarg Robbery)


Samrudhi Mahamarg Robbery : दगडफेक अन् हवेत २ राऊंड फायर


यानंतर लुटारूंनी हिंगोलीच्या एका वाहनावर दगडफेक करत लूटमार केली, तर एका वाहनचालकाने प्रसंगावधान राखून कारचा वेग वाढवल्याने तो सुखरूप बचावला. त्यानंतर मध्यरात्री १.४० वाजेच्या सुमारास मुंबईहून नांदेडकडे परतणारे वाहन व्यावसायिक यांच्या कारचे टायरही खिळे टाकून फोडण्यात आले. कार थांबताच हातात धारदार हत्यारे घेतलेले १२ ते १३ दरोडेखोर चालकाच्या दिशेने धावले. मात्र, चालकाने तातडीने स्वतःजवळील रिव्हॉल्व्हरमधून हवेत २ राऊंड फायर केले. गोळीबाराच्या आवाजाने घाबरून लुटारूंनी महामार्गावरून खाली उड्या मारून पळ काढला.


Samrudhi Mahamarg Robbery : दिवसाढवळ्या उद्योजकाचा ४ कि.मी. पाठलाग, अडीच तोळ्यांची साखळी हिसकावली


समृद्धी महामार्गावर केवळ रात्रीच नव्हे, तर भरदिवसाही दरोडेखोरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. मुंबई कॉरिडॉरमधील एक्झिट क्र. १८ (हडस पिंपळगाव टोलनाक्याजवळ) गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास असाच एक खळबळजनक प्रकार घडला. उत्तराखंड येथून देवदर्शन करून नाशिकच्या दिशेने 'फॉर्च्यूनर' कारने परतणारे अहिल्यानगर (राहुरी) येथील उद्योजक आणि त्यांच्या मित्रांचा तीन आलिशान गाड्यांनी (काळ्या रंगाची सेल्टॉस, पांढरी क्रेटा आणि काळी एक्सयुव्ही ७००) सुमारे ३ ते ४ किलोमीटर पाठलाग केला.


Samrudhi Mahamarg Robbery : असा घडला थरार


दरोडेखोरांनी टोलनाक्याजवळ एसयूव्ही गाडी आडवी घालून "मागे काहीतरी झाले आहे, गाडी बाजूला घ्या" असा बनाव केला. गाडी थांबताच तिन्ही वाहनांमधून उतरलेल्या १० ते ११ जणांनी फॉर्च्यूनरला तिन्ही बाजूंनी घेरले. एका दरोडेखाने उद्योजकाला मारहाण करत त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांची सोन्याची साखळी हिसकावून घेतली. मात्र, आपला हा सर्व प्रकार कारच्या डॅश कॅमेऱ्यात (Dash Cam) कैद होत असल्याचे लक्षात येताच दरोडेखोरांनी तिन्ही गाड्यांमधून पोबारा केला. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी दरोडेखोरांनी वाहनांवर बनावट नंबरप्लेट वापरल्याचा संशय असून डॅश कॅमेऱ्यातील फुटेजच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.