आश्वासनांनी तातडीने पूर्तता करण्याची मागणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कॉक्रोच जनता पक्षाने (सीजेपी) आपल्या मागण्या पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला. अपूर्ण आश्वासने देऊन सरकार पळ काढू शकत नाही. सरकारसमोर ठेवलेल्या चार मागण्यांपैकी तीन मागण्या अपूर्ण आहेत. या मागण्या तातडीने पूर्ण करण्याचा इशारा ‘सीजेपी’ने सरकारला दिला आहे. आपल्या आग्रही मागण्यांसाठी कॉक्रोच जनता पार्टी 5 सप्टेंबर रोजी दिल्लीत आणखी एका मोर्चाची योजना आखत आहे. त्यांनी जनतेलाही यात सामील होण्याचे आवाहन केले आहे.
नीट पेपरफुटी आणि परीक्षेतील अनियमिततेविरोधात कारवाईच्या मागणीसाठी सीजेपीने 20 जून रोजी जंतरमंतर येथे आंदोलन सुरू केले होते. सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर 25 जुलै रोजी आंदोलन संपवण्यात आले. यादरम्यान केंद्र सरकारने ‘सीजेपी’ला काही आश्वासने दिली होती. त्यानुसार, मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यात यावी. विद्यार्थ्यांविरुद्ध दाखल केलेले एफआयआर मागे घेण्यात यावेत आणि कोणतीही कारवाई करू नये. तसेच आरएएफ आणि दिल्ली पोलिसांनी माफी मागावी अशा मागण्या करण्यात आल्या होत्या. मात्र, सरकारने यासंबंधी दिलेल्या आश्वासनांनी पूर्तता अद्याप न केल्याने ‘सीजेपी’ पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात आहे
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.