Sonam Wangchuk On Salman Khan: प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पण, यावेळी कारण कोणतंही आंदोलन किंवा उपोषण नाही. ते चर्चेत आले आहेत, त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमुळे. काही दिवसांपूर्वी नीट पेपरफुटी प्रकरणातील गैरव्यवहारामुळे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीनं आंदोलन केलं होतं. त्यावेळी जंतर-मंतरवर (Jantar Mantar) सोनम वांगचुक उपोषणाला बसले होते. त्यानंतर त्यांचं उपोषण मोडीत काढण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. आंदोलनस्थळी अनेक नाट्यमयी घडामोडी घडल्या. अक्षरशः उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांना उचलून रुग्णालयात नेण्यात आलेलं. याच सर्व घडामोडींवर सोनम वांगचूक यांनी भाष्य केलं आहे. तसेच, त्यांनी त्यावेळी बॉलिवूड स्टार्स आमीर खान आणि सलमान खान यांनी केलेल्या वक्तव्यांचा समाचारही घेतला आहे. 


उपोषणावेळी सोनम वांगचुक म्हणजे, आमिर खानचा गाजलेला सिनेमा 'थ्री इडियट्स'मधील फुंसुक वांगडू आणि त्यांना पाठिंबा दिला पाहिजे, अशा आशयाचा पोस्ट फिरु लागलेल्या. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आमिर खाननं 'थ्री इडियट्स'मधल्या पात्राचा सोनम वांगचुक यांच्याशी संबंध नसल्याचं सांगितलेलं. तसेच, आपण कधीही त्यांना भेटलो नसल्याचंही आमिर म्हणालेला. यावर सोनम वांगचुक यांनी आमिरचा उल्लेख 'गजनी' असा केलाय. तसेच, "सोनम इट्स डन ब्रो... आता उपोषण थांबव...", असं म्हणणाऱ्या सलमान खानला सोनम वांगचुक यांनी तिखट शब्दांत झोडून काढलं आहे. 


प्रखर गुप्ता यांच्या यूट्यूब चॅनेलवरील एका पॉडकास्टमध्ये बोलताना, वांगचुक यांनी 'सीजेपी' आंदोलनाबाबत सलमान खाननं केलेल्या 'त्या' व्हायरल वक्तव्यावर अप्रत्यक्ष टीका केलीय. 


सलमान खानच्या 'त्या' इन्स्टा पोस्टवर सोनम वांगचुक नेमकं काय म्हणाले? (Salman Khan On Sonam Wangchuk)


प्रखर गुप्ताला दिलेल्या मुलाखतीत सोनम वांगचुक यांनी बॉलिवूडचे खान्स आमीर आणि सलमानवर निशाणा साधलाय. 


आंदोलनावेळी केलेल्या वक्तव्यांवर आता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सलमान खाननं दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनामध्ये आधी विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला, त्यानंतर 24 तासांत आंदोलन मागे घेण्याबाबत पोस्ट केली होती. "सोनम, आता बास झालं ब्रो...", असं सलमान खान म्हणाला होता. याबाबत मुलाखतीमध्ये विचारल्यानंतर सोनम वांगचुक म्हणाले की, "प्रत्येकाचाच काही ना काही नाईलाज असतो, मला त्यात पडायचं नाही..."


पुढे बोलताना ते म्हणाले की, "तुम्हाला सगळ्या बाजूंनी विचार करावा लागतो. त्यानं निदान काहीतरी भूमिका घेतली, या गोष्टीचा मी आदर करतो... पण, त्याच्या नाइलाजाबद्दल मी काहीही बोलू शकत नाही..."


"सोनम इट्स डन ब्रो..." सलमान खानची 'ती' पोस्ट काय? (Salman Khan Insta Post For Sonam Wangchuk)


22 जुलै रोजी सोनम वांगचुक उपोषणाच्या शेवटच्या टप्प्यात असताना सलमान खाननं सोशल मीडियावर त्यांना पाठिंबा दिला होता. विद्यार्थी असतानाचा स्वतःचा एक जुना फोटो शेअर करत सलमान खाननं राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा म्हणजेच, नीटच्या पेपरफुटीविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला. पण, विद्यार्थ्यांचं समर्थन करणाऱ्या पोस्टनंतर 24 तासांतच सलमान खाननं यु-टर्न घेत, सोनम वांगचुक यांना उपोषण थांबवण्याचं आवाहन केलेलं.




सलमान खाननं आपल्या पोस्टमध्ये लिहिलेलं की, "विद्यार्थ्यांचं हित सर्वांत महत्त्वाचं आहे. आता पंतप्रधानांनी ट्वीट करून नीट पेपरफुटीमधील दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय... ते योग्य ते कारवाई करतील याची मला खात्री आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, कृपया आता तुमच्या घरी जा... "सोनम, इट्स डन ब्रो... हा विषय आणखी ताणू नकोस. गरज पडल्यास हा उत्साहनंतर कधीतरी दाखवता येईल. आता काहीतरी खाऊन घे... तुला हवं असेल, तर मी घरून जेवण पाठवून देईन...", असं सलमान म्हणालेला. 



Samay Raina Bihari Joke Row: समय रैना 'इंडियाज गॉट लेटंट 2' मध्ये शेरॉनला म्हणाला, 'तुम्ही बिहारी नोकरीसाठी मुंबईत येता...'; मनोज वाजपेयी संतापून म्हणाले...

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.