Disha Salian Death Case Bombay High Court Hearing : दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन (Disha Salian) हिच्या मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) आज (2 सप्टेंबर) आपला निर्णय देण्याची शक्यता आहे. परिणामी आजच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. सकाळी 11 वाजता न्या. सारंग कोतवाल आणि न्या. रणजितसिंह भोसले यांचं खंडपीठ फैसला सुनावणार आहे. गेल्या शुक्रवारी म्हणजे 28 ऑगस्टला याप्रकरणी सुनावणी पूर्ण झाल्यावर मुंबई उच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. त्यामुळे आज याबाबत मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) आज (2 सप्टेंबर) आपला निर्णय देण्याची शक्यता आहे.
नेमकं प्रकरण काय? (Disha Salian Death Case)
दरम्यान, 8 जून 2020 ला दिशाचा मालाड येथील राहत्या घरातून पडून मृत्यू झाला होता. दिशाने अभिनेता सुशांत सिंह राजपूत सोबत देखील काही काळ काम केलं होतं. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सविस्तर तपास करून दिशाने आत्महत्या केल्याचा दावा केला होता. तर मार्च 2025 मध्ये दिशाचे वडील सतीश सालियन यांनी दिशावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सविस्तर सुनावणी घेण्यात आली. यावेळी पोलिसांच्या तपासावर मुंबई उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित करत पोलिसांनी गुन्हा का दाखल केला नाही? ते आताही पुन्हा गुन्हा दाखल करून तपास करू शकतात, असं निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवलं होतं.
Disha Salian Death Case : वडिलांबद्दल पूर्ण सहानभूती, त्यांना क्लोजर मिळाला पाहिजे
तसेच या प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकारणात आम्हाला कोणताही रस नसून एका वडिलांनी त्यांची मुलगी गमावली आहे, याच दृष्टीने याकडे आम्ही पाहतो. असं निरीक्षण देखील उच्च न्यायालयाने नोंदवलं होतं. दिशाच्या मृत्यूची सविस्तर चौकशी करण्यात आली असून दोन वेळा याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. यात काही संशयास्पद नसून आत्महत्याच असल्याचा सरकारी पक्षाचा युक्तिवाद आहे. तसेच याचिकेत तथ्य नसून ती फेटाळण्याची मागणीही सरकारी पक्षाने केली होती.तर ऐकिव माहितीच्या आधारावर तसेच राजकीय वैरापोटी आरोप करण्यात आल्याचा युक्तिमान आदित्य ठाकरे यांच्या वतीने करण्यात आला होता. राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी हे घडवून आणण्याचा देखील त्यांनी दावा केला होता. आम्हाला वडिलांबद्दल पूर्ण सहानभूती आहेत त्यांना क्लोजर मिळाला पाहिजे या मताचे आम्हीही आहोत. मात्र, या याचिकेत ज्या काही मागण्या करण्यात आलेल्या आहेत त्या टिकण्यायोग्य नाहीत. माझ्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांची ही खेळी आहे. ही याचिका तथ्यांना धरून नाही. वाट्टेल ते आरोप करत राजकीय वैर साध्य करण्यासाठी याचिका करण्यात आली आहे. माझी दिशाच्या वडिलांच्या बाबतीत पूर्ण संवेदना आहे. पण त्यांच्या मुलीच्या मृत्यूवरून जे काही राजकारण सुरू आहे ते थांबायला हवे. असं देखील निरीक्षण नोंदवलं गेलं होतं.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.