बातमी शेअर करा :


































सामनाचे अनुसरण करा






नेवासा तालुक्यातील वडुले गावच्या शिवारात शेतात गांजाची लागवड करून त्याची विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकाराचा पोलिसांनी पर्दाफाश केला. ‘नशामुक्त अहिल्यानगर’ अभियानांतर्गत नेवासा पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 40 ते 50 गांजाची जिवंत झाडे आणि 170 किलो वाळवलेला गांजा जप्त केला.


पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी जिह्यात ड्रग्जविरोधात कडक मोहीम राबविण्याचे आदेश दिल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक वाकचौरे आणि शेवगावचे एसडीपीओ राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.


वडुले शिवारातील बबन शंकर देशमुख (वय 60) यांच्या शेतात गांजाची लागवड करून तो सुकवून विकला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी शेतात छापा टाकला. छाप्यात 40 ते 50 गांजाची झाडे आढळून आली. तसेच सुकवून विक्रीसाठी ठेवलेला गांजाही पोलिसांच्या हाती लागला. या कारवाईत एकूण 170 किलो गांजा जप्त करण्यात आला.


या कारवाईत पीएसआय विकास पाटील, हेड कॉन्स्टेबल काळोखे, वाघमोडे, शेळके, गाजरे, बर्डे, कॉन्स्टेबल अप्पा वैद्य, गवळी, वाघ, नारायण दमाळे, महिला कॉन्स्टेबल गीता पवार, सुमित करंजकर, होमगार्ड सांगळे यांच्या पथकाने कारवाई केली.







Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.