नलगोंडा: तेलंगणाच्या नलगोंडामध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांदरम्यान सोमवारी रात्री उशिरा झटापट झाली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष नागम वार्षित रेड्डी यांच्या घरात तोडफोड केली. पोलिसांनी स्थिती सांभाळण्यासाठी मंत्री कोमाटिरेड्डी वेंकट रेड्डी यांचे कार्यालय अन् भाजप जिल्हा कार्यालयाची सुरक्षा वाढविली आहे. हा वाद भाजप कार्यकर्त्यांकडून सोमवारी मंत्र्यांच्या कार्यालयात तोडफोड करण्यात आल्यावर सुरू झाला. त्यापूर्वी युवा काँग्रेसच्या निदर्शनांदरम्यान भाजप कार्यालयावर काळा रंग फेकण्यात आला होता.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.