छत्रपती संभाजीनगर: राज्यातील अभियांत्रिकी शिक्षणासाठी बंधनकारक असलेल्या आणि राज्य सरकारच्या स्वतंत्र CET सेलकडून घेतल्या जाणाऱ्या MHT-CET परीक्षेत मोठा गैरव्यवहार (Chhatrapati Sambhajinagar Crime) झाल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. यंदा ही परीक्षा राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांनी दिली होती. या परीक्षेतील तब्बल 4 लाख 59 हजार 993 विद्यार्थ्यांचा डेटा लीक झाल्याची बाब छत्रपती संभाजीनगरचे शिक्षक नारायण शिंगारे यांनी समोर आणली आहे.(Chhatrapati Sambhajinagar Crime)


शिंगारे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, संभाजीनगर मधील एका व्यक्तीकडून हा डेटा त्यांनी अवघ्या 10 हजार रुपयांना विकत घेतला आहे. या डेटामध्ये विद्यार्थ्यांचे नाव, परीक्षा केंद्र, कोणत्या ग्रुपसाठी परीक्षा दिली, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा आहे. यासंदर्भात शिंगारे यांनी CET सेलकडे दि. 1 सप्टेंबर 2026 रोजी पत्रान्वये तक्रार केली आहे. हा संपूर्ण लीक झालेला डेटा CET सेलने स्वीकारला असून त्याबाबतच्या पत्राची पोच देखील तक्रारदारांना दिली आहे. तर दुसरीकडे CET सेलला याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, "CET च्या अभियांत्रिकी व इतर प्रवेश परीक्षेचा डेटा लीक झाल्याबद्दलची तक्रार श्री. नारायण शिंगारे यांनी CET कडे केली आहे. या तक्रारीची कक्षाद्वारे अंतर्गत पडताळणी करण्यात येत असून, पडताळणीच्या निष्कर्षांच्या आधारे आवश्यकतेनुसार पोलीस यंत्रणेकडे तक्रार दाखल करण्यात येईल."(Chhatrapati Sambhajinagar Crime)


Chhatrapati Sambhajinagar Crime : नारायण शिंगारे यांचे आरोप काय आहेत?


शिंगारे यांच्या म्हणण्यानुसार, माझ्या माहितीनुसार विद्यार्थ्यांचा हा Data महाराष्ट्रातील विविध Admission Consultancies/Agents, Engineering Admission संबंधित व्यक्ती अथवा काही College संबंधित व्यक्तींकडे आधीपासून उपलब्ध असण्याची शक्यता आहे. हा डेटा Agencies कडे कोणत्या कारणामुळे पोहोचला आणि त्याचा गैरवापर झाला का? याची चौकशी होणे आवश्यक आहे. कारण अनेक Consultancies विद्यार्थ्यांना थेट फोन करून किंवा मेसेज करून मोठ्या आर्थिक रकमेच्या बदल्यात “तुमचे CET गुण/Percentile वाढवून देऊ”, “तुमचे परीक्षा केंद्र Manage करून देऊ”, “COEP, VJTI, PICT, SPIT या सारख्या नामांकित कॉलेजमध्ये डायरेक्ट प्रवेश मिळवून देऊ” अशा प्रकारची आश्वासने देत आहेत. काही Educational Consultancies तर Social Media वर थेट COEP, VJTI, PICT, SPIT मध्ये Admission करून देण्याची Guarantee देत असल्याचे दिसून येते.


Chhatrapati Sambhajinagar Crime : मेरिट लिस्टमधील संशयास्पद गोष्टी -


1. Merit List मधील विद्यार्थ्यांचे राहण्याचे गाव व त्यांनी CET परीक्षा दिलेली केंद्रे यांचा अभ्यास केल्यावर - पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, मुंबई तसेच राज्याबाहेरील बरेच विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नागपूर व विदर्भातील इतर दूरच्या जिल्ह्यांमध्ये गेले असल्याचे दिसते. स्वतःच्या परिसरात केंद्र असताना शेकडो किमी दूर जाणे म्हणजे सेंटर मॅनेज झाल्याचा संशय.
2. Merit List मधील Top Rankers मध्ये चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर या भागांकडे असामान्य Concentration दिसते.
3. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा परिसरात एकाच पिनकोडमधील सुमारे सहा विद्यार्थी Top 100 मध्ये आले आहेत.


एकाच लहान परिसरातील एवढ्या विद्यार्थ्यांना अत्यंत उच्च Rank मिळणे हा योगायोग आहे की त्यामागे एखादे विशिष्ट Exam Centre, Agent, Consultancy किंवा Response Sheet Manage करण्यात आली? (या बाबतीची एक संशयास्पद रेकॉर्डिंग माझ्याकडे उपलब्ध आहे) असा सवाल शिंगारे यांनी उपस्थित केला आहे.


Chhatrapati Sambhajinagar Crime : प्रकरणाची गंभीरता -


ही बाब केवळ एका परीक्षेपुरती मर्यादित नाही. यामुळे महाराष्ट्रातील लाखो प्रामाणिक विद्यार्थी आणि पालकांचे भविष्य धोक्यात येऊ शकते. जर काही विद्यार्थी मोठी रक्कम देऊन परीक्षा केंद्र Manage करून, Response Sheet बदलून उच्च Percentile मिळवत असतील आणि COEP/VJTI/PICT/SPIT मध्ये प्रवेश घेत असतील, तर प्रामाणिक विद्यार्थ्यांची Merit ची जागा हिरावली जाते. त्यामुळे संपूर्ण MHT-CET परीक्षा व Engineering Admission Process च्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो.


Chhatrapati Sambhajinagar Crime : शिंगारे यांची मागणी 


4,59,893 विद्यार्थ्यांचा डेटा नेमका कुठून लीक झाला, त्याची पहिली प्रत कोणी तयार केली, कोणाला विकला आणि किती आर्थिक व्यवहार झाला, याचा शोध घ्यावा. CET Cell चे Server Logs, Database Access Logs, Response Sheet Modification Logs, System Audit Trail तातडीने सुरक्षित करावेत. MHT-CET परीक्षा घेणाऱ्या Company/Agency चे Server आणि System Logs तपासावेत आणि संशयित परीक्षा केंद्रांचे CCTV Footage, Computer Logs, Candidate Login Details, Seating Arrangement सुरक्षित करून तपासावेत. Audio Clips, Phone Numbers, WhatsApp Messages, Pen Drive Data, Excel Files, Financial Transaction Proof हे सर्व पुरावे देण्यास तयार असल्याचेही शिंगारे यांनी म्हटले आहे.


१. डेटा लीकचा मुख्य आरोप:
- 4,59,893 विद्यार्थ्यांचा डेटा लीक
- फक्त 10 हजार रुपयात संभाजीनगरमधून खरेदी केला
- डेटात - नाव, परीक्षा केंद्र, ग्रुप, मोबाईल नंबर, ईमेल आयडी


२. डेटा कुणाकडे पोहोचला?
- हा डेटा महाराष्ट्रातील विविध Admission Consultancies / Agents / काही कॉलेजकडे आधीपासून असण्याची शक्यता
- या डेटाचा गैरवापर सुरू


३. Consultancies कडून आमिष:
- विद्यार्थ्यांना फोन / मेसेज करून - “Percentile वाढवून देऊ”, “सेंटर Manage करून देऊ”, “COEP, VJTI, PICT, SPIT मध्ये डायरेक्ट प्रवेश मिळवून देऊ”
- सोशल मीडियावर Guarantee च्या जाहिराती
- पुरावे म्हणून - जाहिरातींचे फोटो, पर्सनल नंबरवर आलेले मेसेजचे स्क्रीनशॉट, व्हायरल ऑडिओ


४. परीक्षा केंद्राबाबत संशय:
- पुणे, नगर, संभाजीनगर, नांदेड, मुंबईतील विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नागपूर - विदर्भात दूरच्या जिल्ह्यात गेले
- स्वतःच्या शहरात केंद्र असताना 500-600 किमी दूर जाण्याचे कारण काय? सेंटर मॅनेज झाल्याचा संशय


५. टॉप रँकर्समध्ये संशयास्पद Concentration:
- Top Rankers मध्ये चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर भागात असामान्य गर्दी
- धाराशिवच्या उमरगा - एकाच पिनकोडमधील 6 विद्यार्थी Top 100 मध्ये


६. Response Sheet Manage चा आरोप:
- CET Cell ने ज्या कंपनीला परीक्षा घेण्याचे काम दिले, त्या कंपनीशी संबंधित व्यक्ती मार्फत Response Sheet बदलून देण्याची चर्चा - याची संशयास्पद रेकॉर्डिंग तक्रारदाराकडे उपलब्ध


७. गांभीर्य:
- प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या Merit च्या जागा हिरावल्या जात आहेत
- संपूर्ण MHT-CET आणि Engineering Admission Process च्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह
- संघटित परीक्षा गैरव्यवहाराचा संशय


८. मागण्या - काय तपासावे:
- डेटा कुठून लीक झाला, कोणी विकला, किती व्यवहार झाला
- CET Cell चे Server Logs, Database Access Logs, Download Logs, IP Address, Response Sheet Modification Logs, Audit Trail सुरक्षित करून तपासा
- परीक्षा घेणाऱ्या कंपनीचे Server / System Logs तपासा
- संशयित परीक्षा केंद्रांचे CCTV Footage, Computer Logs, Login Details, Seating Arrangement, Staff Details, Centre Allocation Records तपासा
- Audio Clips, WhatsApp Messages, Pen Drive, Excel Files, Transaction Proof हे पुरावे देण्यास तयार


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.