बातमी शेअर करा :


































सामनाचे अनुसरण करा






नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णाला एक्सपायरी डेट संपलेले सलाईन चढविल्याने त्याची प्रकृती खालावल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. प्रकृती बिघाडल्यानंतर रुग्णाला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.


गोपीराम खडसे (५०) यांना ३१ ऑगस्ट रोजी ताप आणि चक्कर येत असल्याने वाशी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर त्यांना वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. मंगळवारी सकाळपासून दुपारपर्यंत त्यांची प्रकृती स्थिर होती. मात्र त्यानंतर प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी हिरानंदानी (फोर्टीस) रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान खडसे यांना एक्सपायरी डेट संपलेले सलाईन लावण्यात आल्याचे नंतर निदर्शनास आले, असा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. सलाईन चढवल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडत गेली असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.







Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.