बातमी शेअर करा :


































सामनाचे अनुसरण करा






एमबीबीएसच्या विद्यार्थिनीला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. प्रथम वर्षाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना एकूण चारच प्रयत्न करता येतील. प्रत्येक विषयासाठी स्वतंत्रपणे चार प्रयत्नांची संधी मिळणार नाही, असे स्पष्ट करत हायकोर्टाने अ‍ॅनाटॉमी विषयाची आणखी एक परीक्षा देण्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थिनीची याचिका फेटाळून लावली.


आर्या पाटील या विद्यार्थिनीने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रथम वर्ष एमबीबीएसच्या अ‍ॅनाटॉमी विषयाची प्रात्यक्षिक व लेखी (थिअरी) परीक्षा पुन्हा देण्याची परवानगी मिळावी, यासाठी याचिका दाखल केली होती. या विद्यार्थिनीने ऑगस्ट २०२३ मध्ये प्रथम वर्ष एमबीबीएसला प्रवेश घेतला होता. तिने अ‍ॅनाटॉमी वगळता अन्य विषयांच्या अंतर्गत मूल्यमापनात आवश्यक पात्रता मिळवली होती. त्यानंतर तिने अ‍ॅनाटॉमीची परीक्षा तीन वेळा दिली; मात्र लेखी परीक्षेत ती उत्तीर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे अ‍ॅनाटॉमीची चौथ्यांदा परीक्षा देण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी याचिकाकर्त्या विद्यार्थिनीने केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती रियाझ छागला व न्यायमूर्ती फिरदोस पुनिवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. विद्यापीठाने युक्तिवाद करताना २०२३ च्या नियमावलीतील नियम २१ चा आधार घेत, प्रथम वर्ष एमबीबीएससाठी चारपेक्षा अधिक प्रयत्न करता येणार नसल्याचे स्पष्ट केले.







Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.