Vidyanand Bapat Pune : पुण्यात गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाबाबत सातत्याने आपलं मत मांडणाऱ्या आणि डीजेला विरोध करणारे विद्यानंद बापट चांगलेच चर्चेचा आले आहेत. विद्यानंद बापट यांनी गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषणाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना मारहाण देखील करण्यात आली. या सर्व घटनेनंतर देखील ते डीजेच्या विरोधात लढत राहणार असल्याचं म्हणाले आहेत. अशातच आता सोशल मिडीयावरती एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांनाच डीजेवर नाचवल्याचा एआय व्हिडीओ समोर आला आहे. डीजेच्या एलईडी लाईटवर विद्यानंद बापट यांचा एआय व्हिडीओ झळकला. त्यावर बापट यांनाच नाचवताना पहायला मिळालं आहे, या व्हिडीओवरती विद्यानंद बापट यांना एका वृत्तसंस्थेने मुलाखतीवेळी याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले आर्टिफिशिल इंटेलिजन्सचा तर त्याच्यात ते डीप फेक म्हणतात, त्यामध्ये काय वाटेल ते व्हिडिओ फोटोज आणि किंवा म्हणजे इमेजेस म्हणा या बनवल्या जातात, त्या सगळ्यावरती मी कशाला प्रतिक्रिया करू, असं ते म्हणालेत.
एआयचा जमाना आहे, काय वाटेल ते सुरू आहे, स्वतः पंतप्रधान मोदींनी पण एकदा म्हणाले होते की, मी आता व्हिडिओ बघितला डीपफेक काय म्हणतात ते की त्याच्यात मी गरबा खेळताना दाखवलंय स्वतः त्यांनी असं सांगितलं होतं, बरोबर की नाही, एक वर्षभरापूर्वी पंतप्रधानांनी ते सांगितलं होतं, तर त्यांचं एआय व्हिडीओ जिथे बनू शकतात, तिथे माझ्या नावावर काय, आर्टिफिशिल इंटेलिजन्सचा तर त्याच्यात ते डीप फेक म्हणतात, त्यामध्ये काय वाटेल ते व्हिडिओ फोटोज आणि किंवा म्हणजे इमेजेस म्हणा, या बनवल्या जातात. तर त्या सगळ्यावरती मी कशाला प्रतिक्रिया करू मला मुद्द्यावरती फोकस राहायचं आहे, असंही ते पुढे म्हणालेत.
काही मीम्स वगैरे येतात ते बघता का? या प्रश्नावरती बोलताना विद्यानंद बापट म्हणाले की,हा काही काही माझ्या दृष्टिक्षेपास पडतात पण सगळे काही प्रत्येक बघणं शक्य होत नाही, कारण मी तुमच्यासारख्या मीडिया पर्सन बरोबर इंटरव्यूमध्ये बिझी असतो आणि अवधूत गुप्तेने काल गाणंही केलं तुमच्यावर ते पाहिलं का? यावर बापट म्हणाले, ते आलं दृष्टिक्षेपात माझ्या, पाहिलं मी ते, पूर्ण नाही बघण्यात आलं, पण ओके आहे, म्हणजे प्रत्येक जण ज्या-ज्या प्रकारचा कलाकार असतो, कोणी चित्रकार काही चित्र काढतील, संगीतकार असतील ते संगीत, गाणी बनवती, त्यामुळे कॉजवर फोकस करायचं आहे, कार्यसिद्धी होणं गरजेचे आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
आज सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो आहे. पुण्यात याची खास लौकिक परंपरा आहे. अनेक मंडळं यासाठी डीजे लावून दहीहंडीचा आनंदोत्सव साजरा करतात. अशातच आता डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांनाच डीजेवर नाचवल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. डीजेच्या एलईडी लाईटवर विद्यानंद बापट यांचा एआय व्हिडीओ लावण्यात आला होता. त्यावर बापट यांनाच नाचवताना पहायला मिळालं आहे. त्यामुळे नाद करा पण पुणेकरांचा कुठं! अशी चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.