Who is Bittu Tabahi: मध्य प्रदेशातील बियावरा येथे एका 21 वर्षीय बी.एस्सी. (B.Sc.) विद्यार्थ्याने प्रदूषित अजनार नदी स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले असून, स्थानिक नगरपालिका आता त्याच्या या प्रयत्नांना पाठिंबा दिला आहे. सोशल मीडियावर 'बिट्टू तबाही' (Bittu Tabahi) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सुरेंद्र सिंग चौधरीने (River Cleaning Boy) 26 जानेवारी 2026 रोजी ही मोहीम सुरू केली. आरोग्याला असलेले धोके आणि श्वापदांचा सामना करावा लागत असताना र 'बिट्टू तबाही ने मोठ्या धाडस आणि जिद्दीने मोठ्या प्रमाणावर एकट्यानेच नदीतील कचरा आणि गाळ साफ केला आहे. त्याचा या कार्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. तर दुसरीकडे, एकट्याने नदी स्वच्छ करणाऱ्या बिट्टूला नेदरलँड्समधून नोकरीची ऑफर मिळाल्याची माहिती आहे. तर इंग्लिश क्रिकेटपटू केविन पीटरसननेही (Kevin Pietersen) त्याचे कौतुक केले.
वयाच्या 20 व्या वर्षी, बिट्टू तबाही एका प्रदूषित नदीत उतरला. त्याच्याकडे हातमोजे नव्हते, बूट नव्हते आणि त्याला पोहताही येत नव्हते. तरीही, त्याने एकट्याने नदी स्वच्छ करण्यास सुरुवात केली. '26 जानेवारी 2026 रोजी, बीएससीचा विद्यार्थी असलेल्या बिट्टूने, मध्य प्रदेशातील बियाओरा येथील एका मंदिराच्या जवळ असलेली अजणारा नदी स्वच्छ करण्याची मोहीम सुरू केली. नदीचा काही भाग कचऱ्याचा ढिग बनला होता. बिट्टूने तेथून प्लास्टिक आणि इतर कचरा काढायला सुरुवात केली. त्याने पूजेच्या साहित्याच्या कचऱ्यापासून खत बनवण्याची प्रक्रियाही सुरू केली आणि मित्रांच्या मदतीने स्वच्छतेची साधने व कचराकुंड्या खरेदी करण्यासाठी पैसे जमा केले. या मोहिमेसाठी अंदाजे 30,000 रुपये खर्च आला. एका क्षणी तर त्याच्या हातांना संसर्गही झाला, पण त्याने हार मानली नाही.
Bittu Tabahi: बिट्टूलाला डच संस्था 'द ओशन क्लीनअप'ने दिली नोकरीची संधी
अशातच आता बिट्टूलाला डच संस्था 'द ओशन क्लीनअप'ने नोकरीची संधी दिली आहे. बिट्टूच्या मेहनतीने प्रभावित होऊन, संस्थेचे संस्थापक आणि सीईओ, बोयान स्लाट यांनी लिहिले, 'आमच्यासोबत काम करायला या. द ओशन क्लीनअप' कंपनी समुद्र आणि नद्यांमधून प्लास्टिकचा कचरा काढण्याचे काम करते. मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात उगम पावणारी अजणारा नदी पूर्वी पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्यासाठी वापरली जात होती, परंतु वाढत्या प्रदूषणामुळे ती एका घाणेरड्या नाल्यात बदलली. बिट्टूने ती स्वच्छ केली आणि सोशल मीडियावर फोटो शेअर केले, जे व्हायरल झाले. शुक्रवारी मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही त्याची भेट घेतली. बिट्टूने नदी स्वच्छ करण्यासाठी वेळ, मेहनत आणि पैसाही खर्च केला. नदीच्या खोल भागातून मोठा कचरा काढण्यासाठी त्याने स्वतःच्या खिशातून जेसीबी मशीनवर पैसे खर्च केले.
Bittu Tabahi News : हाता-पायांवर इन्फेक्शन झालं, पण जिद्द कायम
एका स्थानिक मंदिराच्या जवळ स्वच्छता मोहीम राबवताना बिट्टू तबाहीला हाता-पायांवर संसर्ग (इन्फेक्शन) झाल्याचाही सामना करावा लागला. त्याच्या या प्रयत्नांनी सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे; त्याने स्वच्छतेपूर्वी आणि स्वच्छतेनंतरची नदीची स्थिती दर्शवणारे फोटो तिथे शेअर केले आहेत. बियावरा नगरपालिकेचे उप-अभियंता रूपेश कुमार नेताम यांनी सांगितले की, साचलेला कचरा काढण्यासाठी अवजड यंत्रसामग्री पुरवून नगरपालिकेने चौधरीच्या मोहिमेला पाठिंबा दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.