या घरगुती वादातून झालेल्या भांडणामुळे अमोल प्रचंड मानसिक ताणाखाली होते. याच ताणतणावातून त्यांनी राहत्या घरी गळफास लावून आपले आयुष्य संपवले. एका उच्चशिक्षित आणि यशस्वी तरुणाने अशा प्रकारे अचानक टोकाचा निर्णय घेतल्याने गावासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या या चुकीच्या पावलामुळे दोन निष्पाप चिमुकल्यांचे छत्र हरपले असून गाढवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अमोल गाढवे यांच्या निधनाची बातमी समजताच कुंजीरवाडी गावात शोककळा पसरली. 6 सप्टेंबर रोजी सकाळी 09:00 वाजता कुंजीरवाडी येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.