Kangana Ranauts Janmashtami Bhog Video: बॉलिवूड अॅक्ट्रेस (Bollywood) आणि भाजप खासदार कंगना रनौत (Kangana Ranaut) अनेक कारणांमुळे चर्चेत असते. कधी आपल्या वक्तव्यांमुळे तर कधी इन्स्टाग्राम पोस्टमुळे अभिनेत्री चर्चेत असते. अभिनेत्री इन्स्टाग्रामवरही सक्रीय असते. अलिकडेच अभिनेत्री कृती सेनन आणि रामदेव बाबा यांच्यावर केलेल्या विधानामुळे चर्चेत होती. आता अभिनेत्री श्री कृष्ण जन्माष्टमीच्या (Janmashtami) निमित्ताने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. कंगना बऱ्याचदा सण आणि विशेष प्रसंगी तिच्या घरातील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत अभिनेत्री तिच्या घरी विशेष नैवेद्य करताना दिसत आहे. दरम्यान, अभिनेत्रीला ट्रोल केलं जात आहे. कंगनाचा हा व्हिडीओ एक्सवरही व्हायरल झाला आहे. एक्सवर एकाने कमेंटमध्ये, 'नैवेद्य तयार करण्यासाठी गॅस तरी पेटवला आहेस का?' असा सवाल उपस्थित केला आहे. नेटकऱ्यांच्या निशाण्यावर येताच तिने टिकेकरांना उत्तरही दिलं आहे.
कंगना रनौतने मनाली येथील आपल्या घरात नैवेद्य तयार केले आहे. मायक्रो ब्लॉगिंग साइट एक्सवर @Queen510619151ने कंगनाचा नैवेद्य तयार करतानाचा व्हिडीओ शेअर केला. तसेच म्हटलं की, 'ड्रामा क्विन कंगना आधी गॅस तरी चालू कर. बघ किती कढई किती काळी झाली आहे', यावेळी इतर नेटकऱ्यांनीही तिच्यावर निशाणा साधला. एकाने कमेंटमध्ये म्हटलं की, 'ती आध्यात्मिकच्या ज्योतीवर स्वयंपाक करत आहे'. तर दुसऱ्याने कमेंटमध्ये म्हटलं की, 'ती फक्त स्वयंपाक करत आहे की, फक्त काहीतरी ढवळत आहे?', असा सवाल उपस्थित केला आहे. आणखी एका युझरने कमेंटमध्ये, 'ते आधीच शिजलेलं होतं, तू ते पुन्हा का खराब करतेय?'.
Kangana has made bhog for श्री कृष्ण at her parent's house in Mandi#KanganaRanaut #HappyJanmasthmi pic.twitter.com/p4cfWIZziJ
— Kangana Updates (@KR_Insta2) September 4, 2026
दरम्यान, आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाणारी कंगना रनौत हिने ट्रोलर्सने सडेतोड उत्तर दिलं आहे. तिने कमेंट्सना उत्तर देत म्हटलं की, 'हा हलवा नाही. भोग आहे. भोगसाठी विविध पदार्थ वेगवेगळ्या तयार केले जातात. यानंतर शेवटी एकत्र केले जाते. सेट करुन कापण्यापूर्वीची ही प्रोसेस आहे. जे आई - वडील आणि पृथ्वीवर ओझे आहेत, त्यांच्याकडून स्वयंपाकाचे कौशल्य असण्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. तुम्ही फक्त जेवणावर लक्ष केंद्रीत करा. स्वयंपाक करण्याची चिंता करु नका', असं कंगनाने कमेंटमध्ये म्हटलं आहे.
सध्या कंगना रनौतचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये कंगना रनौत भोग तयार करताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओत कंगना म्हणते की, 'मी आज मंडी येथे, माझ्या आई - वडिलांच्या घरी आहे. हे तेच किचन आहे, जिथे आम्ही सर्व मिळून एकत्र जेवण करत होतो. काम करत होतो. आज आम्ही भगवान श्री कृष्ण यांच्यासाठी भोग तयार करत आहोत. तसेच कादंबरीचाही वाढदिवस आहे. सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा'.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.