कोची : एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानातील क्रू मेंबर्सनं सतर्कता दाखवल्यानं एक मोठा विमान अपघात टळला आहे. कोचीहून अबू धाबीला जाणाऱ्या विमानातील तेल अचानक कमी होऊ लागलं होतं. संकटाचा अंदाज घेत विमानातील क्रू मेंबर्सनं विमान पुन्हा कोचीकडे आणण्याचा निर्णय घेतला. वेळीच विमानाचं कोची विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केल्यानं  दुर्घटना टळली आहे या घटनेबाबत एअर इंडिया एक्स्प्रेस आणि एअरपोर्ट अथॉरिटीकडून अधिकृतपणे काही सांगण्यात आलेलं नाही. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचं सांगितलं जातंय.  


एएनआयनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार एअर इंडिया एक्स्प्रेसचं विमान बोईंग 737 विमान क्रमांक IX 415 कोचीहून अबू धाबीला निघालं होतं. कोची विमानतळावरुन उड्डाण घेतल्यानंतर 50 मिनिटे प्रवास केल्यानंतर क्रू मेंबर्सला मोठ्या संकटाचा अंदाज आला. इंजिन 1 मधील तेल वेगानं कमी होतं, त्यामुळं त्याचा पुरवठा बंद करण्यात आला. यामुळं विमान हवेतच वळवून कोचीला पु्न्हा आणलं गेलं असून चौकशी करण्यात येत आहे. विमानानं पुन्हा उड्डाण घेतलं नाही.  




36000 फूट ऊंचावरुन विमान वळवलं


कोचीहून अबू धाबीला जाणारं विमान 36 हजार फूट उंचीवर असताना तेलाचा दबाव कमी होऊ लागल्यानं इंजिन क्रमांक 1 बंद करण्यात आलं आल. विशेष म्हणजे विमानानं उड्डाण घेतल्यानंतर 50 मिनिटांचा कालावधी होऊन गेला होता. मात्र, विमान परत भारताकडे ववण्यात आलं आणि कोची विमानतळावर लँडिंग करण्यात आलं. 


तेल कमी झाल्यानंतर क्रू मेंबर्सकडून FORDEC चाचणी करण्यात आली होती. एनएनआयनं सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलं की तेलाचं प्रमाण कमी झाल्यानं अबू धाबीला जाण्याऐवजी कोचीला जाण्याचा निर्णय घेण्यात आला. विमानातील तांत्रिक अडचणीला कोण जबाबदार हे अद्याप समोर आलेलं नाही.


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.