सांगली :  कौटुंबिक कलहातून किंवा कर्जबाजारीपणामुळे जीवन संपवल्याचा घटना घडतात, तशीच ह्रदयद्रावक घटना सांगली (Sangli) जिल्ह्यात घडली आहे. जिल्ह्यातील पलूसमध्ये विष प्राशन केल्याने पती-पत्नीचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मनीषा संजय पाटील (वय 42), आणि संजय तात्यासो पाटील (वय 46) अशी मृतांची नावे आहेत. या दाम्पत्याने काही दिवसांपूर्वी विष प्राशन केले होते. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने या दाम्पत्यास मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी, पोलीस (Police) अधिक तपास करत आहेत. 


पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच कर्जाच्या तगाद्यामुळे त्यांनी विषप्राशन केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. संजय पाटील आणि मनीषा पाटील यांनी 2 सप्टेंबर रोजी विष प्राशन केले होते. सुरुवातीला त्यांना ग्रामीण रुग्णालय, पलूस आणि त्यानंतर सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तीन दिवस उपचार घेतल्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने डॉक्टरांनी 5 सप्टेंबर रोजी दुपारी दोघांना डिस्चार्ज दिला होता. मात्र, रविवार 6 सप्टेंबर सकाळी घरी असताना दोघांनाही पुन्हा त्रास सुरू झाला. नातेवाईकांनी त्यांना तातडीने आधी पलूस ग्रामीण रुग्णालय आणि तिथून पुढील उपचारासाठी मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. 


एकाच दिवशी पती-पत्नीचा मृत्यू


6 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता रुग्णालयात आणल्यानंतर तपासणीअंती डॉक्टरांनी मनीषा पाटील यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. तर संजय पाटील यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्यांचाही मृत्यू झाला. एकाच दिवशी पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. याप्रकरणी पलूस पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.



... तेव्हा देवेंद्र फडणवीसांचा मला फोन आला; हैदराबाद गॅझेटच्या जीआरनंतर मुख्यमंत्री काय म्हणाले, जरांगेंनी सांगितलं

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.