बातमी शेअर करा :


































सामनाचे अनुसरण करा






देवरूख-रत्नागिरी मार्गावरील आंबव येथे शुक्रवारी सकाळी गव्याच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या साडवली सह्याद्रीनगर येथील स्वप्नील पेडामकर (वय-३७) याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आहे. तीन दिवसांनी अखेर उपचारादरम्यान स्वप्नील पेडामकरचा सोमवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
सह्याद्रीनगर मित्र मंडळातर्फे स्वप्नीलला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. विशेष म्हणजे सह्याद्रीनगर मित्रमंडळातर्फे यंदाचा दहिहंडी उत्सव रद्द करून त्यातून जमा झालेला निधी स्वप्नीलच्या उपचारासाठी देण्यात आला होता.


स्वप्नील पेडामकर हा शुक्रवारी सकाळी कामानिमित्त आपल्या मोटारसायकलवरून देवरूखहून रत्नागिरीकडे जात होता. याचवेळी आंबव येथे सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या कडेला असलेल्या जंगलातून गवारेडा धावत रस्त्यावर आला व या गव्याची मोटारसायकलला धडक बसली. गव्याच्या जोरदार धडकेत रस्त्यावर फेकल्या गेल्याने स्वप्नीलच्या डोक्याला आणि हाता-पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अधिक उपचारासाठी त्याला रत्नागिरी येथे एका खासगी रूग्णलयात हलवण्यात आले होते. यानंतर त्याच्यावर डेरवण येथील रूग्णालयात अधिक उपचार सुरू होते. त्याची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर त्याची काल सोमवारी मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली व सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास त्याची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.







Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.