बातमी शेअर करा :


































सामनाचे अनुसरण करा






डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी डॉक्टरांसह परिचारिकेवर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच पालघरमध्येही असाच प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. पालघरमधील रिलिफ हॉस्पिटलच्या आयसीयुमध्ये घुसून कर्मचाऱ्यांना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण केली. या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. याप्रकरणी पोलिसांनी कुणाच्याही दबावाला बळी न पडता गुन्हा दाखल झालेल्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.



रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (X) पोस्ट शेअर करत सत्ताधारी शिंदे गटावर थेट निशाणा साधला. पालघरमध्ये हॉस्पिटलच्या आयसीयुमध्ये घुसून कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचं टेंडर काढून ते सत्ताधारी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आलं की काय? अशा घटना राज्यात घडताना दिसतायेत. डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिंदे गटाचा मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रे जामिनासाठी अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत फेऱ्या मारत असताना आणि विनवण्या करत असतानाही यातून या लोकांनी काहीच धडा घेतल्याचं दिसत नाही. सत्तेच्या आणि अधिकाराच्या बळावर आरोग्य कर्मचाऱ्यांना केली जाणारी अशी दादागिरी व मारहाण कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता, गुन्हा दाखल झालेल्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.







Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.