Mukta Barve on Mumbai Pune Mumbai 4: काही महिन्यांपूर्वी 'मुंबई पुणे मुंबई' (Mumbai Pune Mumbai 4) या चित्रपटाचा चौथ्या भागाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर या चित्रपटाच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. सतीश राजवाडे दिग्दर्शित या चित्रपटाच्या चौथ्या भागात गौरी आणि गौतमची पुढची गोष्ट कशी रंगणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. अभिनेता स्वप्निल जोशी आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे यांची लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा या चित्रपटाचा पुढच्या भागात दिसणार आहे. दरम्यान हा चित्रपट येणार कधी याची आतुरता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. दरम्यान अभिनेत्री मुक्ता बर्वेने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत या चित्रपटाविषयी एक मोठी अपडेट चाहत्यांना दिली आहे. ही घोषणा होऊन अनेक महिने झाल्यानंतर चित्रपट नेमकं कधी येणार? याकडे प्रेक्षकांचे लक्ष आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर जोरात काम झाल्याचं मुक्ताने सांगितलं. अमोल परचुरे यांच्या 'कॅच अप' शोमध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे बोलत होती.
अलीकडेच दिलेल्या या मुलाखतीत अभिनेत्री मुक्ता बर्वेला 'मुंबई पुणे मुंबई4 ' चित्रपट येणार आहे की नाही? असे विचारण्यात आले, त्यावेळी मुक्ता म्हणाली 'हा चित्रपट येणार आहे असं आम्हाला पण सांगितलंय.' या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे का? झालंय का? असं विचारल्यानंतर मुक्ता म्हणाली ' शूटिंग झालं नाहीये पण स्क्रिप्टवर जोरदार काम झालंय. सांगितलंय हे करायचं आहे.अजून मी ही स्क्रिप्ट वाचली नाही पण मला आयडिया आहे.पुढच्या भागांमध्ये नेमकं काय होऊ शकते, याची कल्पना असल्याचं ती म्हणाली. चित्रपट येणार आहे का यावर तिने होकारार्थी मान डोलावली.म्हणाली, 'चित्रपट यायला हवा. सगळ्यांची इच्छा आहे.निर्मात्यांकडून याबद्दल संवाद झाला आहे. सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. मला जेवढी माहिती आहे तिथपर्यंत मी तुम्हाला माहिती दिली आहे.' चित्रपटाच्या शूटिंगला कधी सुरुवात होणार आणि रिलीज कधी होणार याबद्दल सांगणं कठीण असल्याचं तिने सांगितलं. सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय.यामध्ये तिने मुंबई पुणे मुंबई चित्रपटाच्या चौथ्या भागाविषयी अपडेट दिली आहे.
'मुंबई पुणे मुंबई' या लोकप्रिय मराठी चित्रपटाचा चौथा भाग आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सतीश राजवाडे दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती संजय छाबरिया व अमित भानुशाली करणार आहेत. 2010 मध्ये या चित्रपटाचा पहिला भाग आला होता.या भागाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं.मुंबईची गौरी आणि पुण्याचा गौतम एकमेकांना भेटतात.मतभेद, टोमणे, वाद आणि नंतर हळूहळू त्यांना प्रेमाची जाणीव होते. या चित्रपटातील संवादांसह गाणी ही प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.2015मध्ये याचे चित्रपटाचा दुसरा भाग आला. दुसऱ्या भागात पहिल्याच भागाची कथा पुढे सरकताना दाखवण्यात आली आहे.गौरी आणि गौतम दोघांचं लग्न, त्यांच्यातील नातेसंबंध कौटुंबिक पार्श्वभूमी अशा अनेक गोष्टी दुसऱ्या भागात दाखवण्यात आल्या होत्या. नंतर 2018 मध्ये सतीश राजवाडे यांनी गौरी आणि गौतम आई बाबा होणार असल्याचं एक गोड कथानक तिसऱ्या भागातून समोर आणलं होतं. गौतम आणि गौरीला जुळी मुलं होतात असं दाखवण्यात आलेलं.आता चौथ्या भागात या दोघांच्या आयुष्यात नेमकं काय घडणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.