Sugar Prices News : ऐन सणासुदीच्या काळात वाढत्या साखरेच्या दरामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडलं असून महागाईची झळ सोसावी लागत आहे. अशातच साखरेचा दरावर (Sugar Prices) नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार विविध स्थरावर उपाययोजना करत आहे. साखरेचे दर (Sugar Price) अचानक वाढल्यामुळं ग्राहकांना मोठा फटका बसत आहे. दरम्यान, वाढत्या साखरेच्या दराच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचा साखर हंगाम (Sugarcane Crushing Season) यंदा 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेतल्याची माहिती आहे.
दरम्यान, सह्याद्री अतिथिगृह येथे विविध कारखान्यांच्या संघटनांचे प्रतिनिधी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह विविध आमदारांच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
Devendra Fadnavis on Sugar Prices : मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय; साखर हंगाम यंदा 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार
देशात साखरेचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे किरकोळ बाजारात साखरेचा दराने उसळी घेतली होती. ऑगस्टमधे साखरेचे दर 70 ते 75 रुपये किलो वर गेल्याच पाहिला मिळालं होतं. तर नोव्हेंबरपूर्वी गळीत हंगाम सुरू करायला शेतकरी आणि कारखान्यांच्या तोट्याचे असल्याचं कारखांदारांनी भूमिका घेतली होती. अशातच आता या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेत राज्याचा साखर हंगाम यंदा 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची माहिती आहे.
Sugar Prices News : साखरेच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना सणावाराला महागाईचे चटके
साखरेच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना सणावाराला महागाईचे चटके सहन करावं लागतायत. गणेशोत्सव तोंडावर आला असताना साखरेसह दूध, डाळींची दरवाढ झालीये. गणेशोत्सवानंतर नवरात्र, दसरा-दिवाळी असा सणांचा सिझन समोर आहे. त्यामुळे साखरेचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी उसाचा गाळप हंगाम महिनाभर आधी सुरू करण्याचा निर्णय सरकार घेऊ शकतं. मात्र याला शेतकरी आणि कारखानदारांनी विरोध दर्शवलाय. रोजच्या स्वयंपाकापासून ते मिठाईपर्यंत, सर्वात जास्त आवश्यक गोष्ट म्हणजे गोडी वाढवणारी साखर. मात्र, ऐन सणासुदीला साखर महाग झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या पाकिटावर ताण येतोय. त्यातच 'सणांचा राजा' दिवाळी जवळ येत असताना सरकारला साखरटंचाईची भीती जाणवू लागलीय. त्यामुळे यंदा उसाचा गाळप हंगाम लवकर सुरू करण्याचं सरकारच्या विचाराधीन आहे. केंद्र सरकारनं देशातलं सर्वात जास्त साखरेचं उत्पादन घेणाऱ्या महाराष्ट्राला तशी सूचना केलीय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मंत्री समितीची बैठक घेतली. या बैठकीत उसाचा गाळप हंगाम कधी सुरू करायचा याचा निर्णय घेतला. गेल्या हंगामात विविध कारणांनी साखरेचं उत्पादन घटल्यामुळे दर चढे राहिलेत. दिवाळीत साखरेनं 'दिवाळं' काढू नये, यासाठी यंदा गाळप हंगाम अधिक लवकर सुरू केलाय. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात गाळप हंगाम सुरू होतो. मात्र, यंदा 15 ऑक्टोबरपासून साखर कारखान्यांची यंत्र सुरू व्हावीत, असा सरकारचा मानस आहे. मात्र, याला साखर कारखानदारांनी विरोध केलाय.
इतर महत्वाच्या बातम्या
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.