Nilesh Sabale On Tukaram Mundhe: महाराष्ट्रातल्या (Maharashtra) प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कार्यक्रम म्हणजे, 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya). तब्बल 10 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर 2024 मध्ये या कार्यक्रमानं निरोप घेतला. पण, तो कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमातल्या कलाकारांना रसिक-प्रेक्षक मात्र विसरलेले नाहीत. 'चला हवा येऊ द्या'च्या टीममधलं सर्वात महत्त्वाचं नाव म्हणजे, निलेश साबळे (Nilesh Sable). 'चला हवा येऊ द्या' संपल्यानंतर निलेश साबळे दुसऱ्या पर्वात दिसले नाहीत. तसेच, ते इतर कोणत्याही शोमध्ये किंवा कार्यक्रमातही दिसले नाहीत. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना त्यांनी त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्सबाबत माहिती दिलीय. 


'चला हवा येऊ द्या' फेम निलेश साबळे यांनी 'लोकमत फिल्मी'ला नुकतीच मुलाखत दिली. त्या मुलाखतीत बोलताना निलेश साबळे यांनी तुकाराम मुंढेंवर भाष्य केलंय. तुकाराम मुंढे साहेबांना बघितलं की, मला माझे वडीलच आठवतात, असं वक्तव्य निलेश साबळे यांनी केलंय. 


'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निलेश साबळे तुकाराम मुंढेंबाबत नेमकं काय म्हणाले? (Nilesh Sabale Talks On Tukaram Mundhe)


मुलाखतीदरम्यान निलेश साबळे म्हणाले की, "तुकाराम मुंढे साहेबांना बघितलं की, मला माझे वडीलच आठवतात. माझे बाबा शिक्षण अधिकारी होते. त्यांनी अनेक जिल्हे सांभाळले आहेत. काहीही करू शकले असते ते, पण त्यांनी काही नाही केलं..."


किस्सा सांगताना निलेश साबळे यांनी सांगितलं की, "मी 10 वीला असताना परीक्षा केंद्रावर खूप कॉपी चाललेली. बाबांची ट्रान्स्फर दर दोन वर्षाला व्हायची. आम्हाला वडिलांनी सांगितलेलं, आपला संसार विंचवाच्या पाठीवरच्या बिऱ्हाडासारखा आहे. शाळा सतत बदलत राहतील तुम्ही तयार राहा. माझी आणि माझ्या भावाची शाळा सतत बदलत राहायची. पण, आम्हाला ती सवय झालेली. स्वतःचं घर नव्हतं. जेव्हा मी परीक्षेला बसलेलो, तेव्हा वडिलांनी सांगितलेलं, चांगले गुण मिळव. वडील एमपीएससी होते. त्यावेळी मी त्या कॉपी बघितल्या. माझे वडील भरारी पथकात असायचे. वडील यायचे, सगळं तपासायचे. तासभर सगळे गप्प, ते गेल्यानंतर पुन्हा कॉपी सुरू. ते बघून मला चीड आली..."


माझ्या आयुष्यातील वडीलच माझे गुरू... : निलेश साबळे 


पुढे बोलताना निलेश साबळे यांनी सांगितलं की, "मी घरी गेल्यानंतर बाबांवर चिडलो. तुम्ही साहेब आहात, तुम्ही माझ्यासाठी काहीही करू शकता, असं मी त्यांना म्हणालो. तर त्यांनी मला हातात काही चाव्या दिल्या आणि सांगितलं की, "तुम्ही जे पेपर लिहिता, ते पेपर ज्या कस्टडीमध्ये जमा होतात, त्या कस्टडीच्या या चाव्या आहेत. इथून पुढे पेपरवर नाव लिहिली आणि मग संध्याकाळी मी तुला पेपर लिहायला देतो. पण, एका पॉईंटला वडील रिटायर होतील एवढं लक्षात ठेव. तू डॉक्टर होणार, पेशंट समोर आला तर वडिलांना फोन नाही करायचा. ते अस्तित्व तुझं तुला निर्माण करायचंय. आयुष्यात ज्या दिवशी प्रामाणिक राहशील, त्या दिवशीची संध्याकाळ छान जाईल." बाबा मला नेहमी प्रामाणिक राहायला सांगायचे... त्यामुळे माझ्या आयुष्यातील वडीलच माझे गुरू आहेत..."



Nilesh Sable On Upcoming Marathi Movie: 'चला हवा येऊ द्या' त्या सिनेमात नाही दिसणार...'; आगामी सिनेमाच्या स्टारकास्टबाबत निलेश साबळेंनी कोणतेही आढेवेढे न घेता थेटच सांगितलं

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.