Sindhudurg Kudal News: सिंधुदुर्गच्या कुडाळमधून एक अत्यंत धक्कादायक आणि चीड आणणारी बातमी समोर येत आहे. एका नामांकित विद्यालयात चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी थेट खेळ खेळला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शालेय पोषण आहारात (School Mid Day Meal) मुदत संपलेले मसाले वापरले जात असून, धान्याचा साठा थेट स्वच्छतागृहाच्या शेजारी अत्यंत किळसवाण्या स्थितीत ठेवल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रकारानंतर शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी शाळेत धडक देऊन प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.


दरम्यान, कुडाळमधील या नामांकित शाळेत तब्बल 400 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात, ज्यातील सुमारे 140 मुले दररोज शाळेत शिजणारा पोषण आहार खातात. मात्र, या चिमुकल्यांच्या आरोग्याची आणि जिवाची प्रशासनाला अजिबात पर्वा नसल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले.


Sindhudurg Kudal News: पोषण आहारासाठी पूर्णपणे झालेले 'एक्स्पायर' मसाले; शिंदे सेनेचे कार्यकर्ते आक्रमक


दरम्यान, पोषण आहारासाठी वापरण्यात येणारे मसाले पूर्णपणे 'एक्स्पायर' झाले होते. एवढेच नाही तर, लहान मुले जो तांदूळ खातात, तो तांदूळ थेट स्वच्छतागृहाच्या शेजारी अस्वच्छ वातावरणात साठवून ठेवण्यात आला होता. शिक्षकांच्या भोंगळ कारभाराचा कळस म्हणजे, हे शिक्षक विद्यार्थ्यांची रोज हजेरी घेतात, मात्र स्वतः मस्टरवर सही करायलाच विसरतात! या सर्व बेजबाबदार प्रकाराची माहिती मिळताच शिंदे सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले. दरम्यान या प्रकरणाची गंभीर दाखल घेऊन दोषींवर कारवाईची मागणी आता करण्यात येत आहे.




Washim Crime: 54 वर्षीय शिक्षकाकडून चिमुकल्या विद्यार्थिनीसोबत संतापजनक कृत्य; ग्रामीण पोलिसात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल



वाशिमच्या एका गावाच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत असाच एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. यात 54 वर्षीय शिक्षकाने जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या अनेक चिमुकल्या विद्यार्थिनीच विनयभंग केल्याची घटना समोर आलीय. यात 54 वर्षीय शिक्षक दिलीप बोरकर यांनी तिसऱ्या आणि चौथ्या वर्गात शिकणाऱ्या चिमुरडया मुलींना जवळ घेत अश्लील चाळे करत विनयभंग केल्याचं एका विद्यार्थिनी तिच्या पालकांना सांगितलं.


दरम्यान, या गंभीर प्रकरणानंतर गावातील काही महिला-पुरुषांनी विकृत शिक्षकाला एकत्र येत बेदम मारहाण करत पोलिसाच्या स्वाधीन केलं. सध्या वाशिम ग्रामीण पोलिसात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास वाशिम ग्रामीण पोलीस करत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या  


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.