Hanuman Ansh Box Office Collection: 'हनुमान अंश' (Hanuman Ansh Movie) बॉक्स ऑफिसवर (Hanuman Ansh BO Collection) शानदार कामगिरी करत असून चित्रपटानं 150 कोटींचा टप्पा पार केला आहे. याचदरम्यान चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक-निर्माते विशाल चतुर्वेदी (Vishal Chaturvedi) यांनी नीम करोली बाबा (Neem Karoli Baba) यांच्या जीवनावर आणि त्यांच्या शिकवणीवर आधारित हा चित्रपट लिहिताना एक अनोखी पद्धत अवलंबल्याचं सांगितलंय. कथा लिहिताना त्यांनी स्वतःला पूर्णपणे डिजिटल दुनियेपासून दूर ठेवलं होतं.


विशाल चतुर्वेदी यांनी सांगितलं की, "मी माझ्या खोलीतून सर्व डिजिटल डिव्हाइस काढून टाकले होते. केवळ चित्रपटाची संपूर्ण कथा नाही, तर प्रत्येक गोष्ट मी पेन आणि कागदावर लिहिली... नंतर त्या पानांचे फोटो माझ्या सहाय्यकांना पाठवत असे आणि ते त्याचे डिजिटल स्वरूपात टायपिंग करत. या पद्धतीमुळे मला कोणत्याही व्यत्ययाशिवाय कथेवर पूर्ण लक्ष केंद्रीत करता आलं..."


याशिवाय विशाल चतुर्वेदी यांनी सांगितले की, "सुरुवातीपासूनच त्यांच्या मनात या विषयावर चित्रपट बनवण्याची स्पष्ट कल्पना होती आणि त्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर संशोधनही केले. या प्रक्रियेत त्यांनी आपल्या निर्मात्यांचेही आभार मानले, ज्यांनी त्यांना कोणतीही घाई न करता आपल्या सर्जनशील पद्धतीने काम करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले."


Just finished watching Hanuman Ansh. Honestly blessed to see a movie like  this : r/hinduism


विशाल चतुर्वेदी म्हणतात, "विशेष म्हणजे संपूर्ण कथा तयार करण्यासाठी मला फारसा वेळ लागला नाही, मात्र चित्रपटाचा पहिला सीन लिहिण्यासाठी जवळपास 45 दिवस लागले. पहिला सीन माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असतो, कारण तोच संपूर्ण कथेची दिशा ठरवतो. एकदा पहिला सीन निश्चित झाला की बाकीची कथा वेगाने पुढे जाते. पहिला सीन सापडल्यानंतर बाकीची कथा आपोआप आकार घेत गेली आणि मी संपूर्ण स्क्रिप्ट केवळ 15 ते 20 दिवसांत पूर्ण केली..."


'हनुमान अंश'च्या मागे विशाल चतुर्वेदी यांची ही मेहनत आणि समर्पण पाहायला मिळते. त्यांनी ही कथा अत्यंत गांभीर्याने आणि श्रद्धेने मांडली आहे. त्यांच्यासाठी हा केवळ एक चित्रपट नसून आस्था, भक्ती आणि प्रेरणेची कथा योग्य पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न आहे. हाताने लिहिलेल्या नोट्सपासून सुरू झालेला हा प्रवास आज वर्षातील सर्वात मोठ्या यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला आहे.         



Hanuman Ansh Actor Fees: 2 कोटींचं बजेट अन् दीडशे कोटींवर कमाई! 'हनुमान अंश'च्या या अभिनेत्याचं नशीब पालटलं; मिळाली फक्त एवढी फी? ऑडिशन न देताच साकारला रोल

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.