Ameesha Patel on Hardik pandya dating Rumours: बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल (Amisha Patel) आणि भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओत (Viral Video) अमीषा पटेल आणि हार्दिक पंड्या एकत्र, बंगळूरूतील (Bengaluru) एका हॉटेल पार्टीमध्ये स्पॉट झाले होते. व्हायरल व्हिडीओत आपण पाहू शकता की,  अमीषाने हार्दिक पंड्याच्या खांद्यावर ठेवला होता. दोघांना एकत्र पाहिल्यानंतर त्यांच्याबाबतीत नेटकऱ्यांनी अनेक तर्क वितर्क लावण्यास सुरुवात केली.  अनेकांनी कमेंट करुन बरेचसे प्रश्न उपस्थित केले. इतकंच नाही,  नेटकऱ्यांनी अमिषा आणि हार्दिकचे नाव जोडण्यासही सुरुवात केली आहे.  दरम्यान, हार्दिकसोबत डेटिंगच्या (Relationship) चर्चांवर अभिनेत्रीने पापाराझींसोबत बोलताना आपलं मौन सोडले आहे. अमीषा पटेल, नेमकं काय म्हणाली? पाहूयात.


अमीषा पटेलला नुकतंच मुंबईत स्पॉट करण्यात आलं होतं.  यावेळी अभिनेत्रीसमोर पापाराझींनी घेराव घातला. एका फोटोग्राफरने अभिनेत्रीला हार्दिक पंड्यासोबत व्हायरल झालेल्या व्हिडीओवर प्रश्न उपस्थित केला. तसेच व्हायरल असलेल्या व्हिडीओवर आणि व्हिडीओवर आलेल्या कमेंटवर तिची प्रतिक्रिया विचारण्यात आली.  हा प्रश्न ऐकताच अमीषा पटेल सुरुवातीला हसली.  नंतर अभिनेत्री म्हणाली की, 'हे खूपच व्हायरल झालं आहे, आता थांबवा', अशी प्रतिक्रिया अभिनेत्रीने दिली आहे. सध्या अभिनेत्रीची प्रतिक्रिया सोशल मीडियात व्हायरल होत आहे.


नेमकं प्रकरण काय? (Ameesha Patel Reacts to Hardik Pandya Dating Rumours in front of paparazzi)


नुकतंच एका युझरने अमीषा पटेल आणि हार्दिक पंड्या या दोघांचा एकत्रित एक व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला होता. अमीषा आणि हार्दिक पंड्या यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला.  बंगळुरू येथील एका हॉटेलमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीमध्ये अमीषा आणि हार्दिक पंड्या या दोघांनाही एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. व्हायरल व्हिडीओत आपण पाहू शकता की,  अमीषाने हार्दिकच्या खांद्यावर हात ठेवला होता.  हा व्हिडीओ शेअर करत युझरने लक्षवेधी कॅप्शनही दिलं आहे.  


'ज्या प्रकारे  अमीषा पटेलने हार्दिक पंड्याच्या खांद्यावर हात ठेवला आहे, असं वाटतंय की रेडिटमध्ये सुरु असलेल्या अफवा खऱ्या आहेत.  हा बंगळुरुतील एका हॉटेलमधली व्हिडीओ आहे', असं कॅप्शन देण्यात आलं आहे. यानंतर अमीषा पटेलने या पोस्टवर रिअॅक्ट केलं. त्याच्या पोस्टवर कमेंट करत म्हटलं की,  'तुमचं बरोबर आहे...अरे देवा, तुमचं बरोबर आहे. खरंच, माझा हात त्याच्या खांद्यावर खूप रोमँटिक पद्धीतने ठेवला होता',  यानंतर तिने हसणारे काही इमोजी या कमेंटमध्ये जोडले. 'मी तुला ओळखत नाही, पण तुझ्या तुझ्या आयुष्यात कुणी मुलगी मैत्रिण म्हणून नसणार', असंही अभिनेत्री म्हणाली.


महत्त्वाच्या इतर बातम्या:


Actress And Influencer Jail Experience: 'मला 27वेळा विवस्त्र केलंय, नको तिथे स्पर्श करुन तपासलंय अन्...'; प्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितला तुरूंगातील भयंकर अनुभव

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.