बातमी शेअर करा :


































सामनाचे अनुसरण करा






‘बाहुबली’ या चित्रपटाने अभिनेता प्रभासला जगभरात ओळख मिळवून दिली. मात्र, या भव्य प्रकल्पासाठी प्रभासने दिलेले योगदानही तितकेच महत्त्वाचे होते. ‘बाहुबली : द बिगिनिंग’ आणि ‘बाहुबली 2 : द कन्क्लुजन’ या दोन्ही चित्रपटांसाठी प्रभासने तीन वर्षांहून अधिक काळ दिला. दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी प्रभासच्या या समर्पणाचे तोंडभरून कौतुक केले आहे.


‘बॉलिवूड बबल’च्या वृत्तानुसार, राजामौली यांनी प्रभासच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, प्रभासने या चित्रपटावर आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला. आपल्या आयुष्यातील साडेतीन वर्षे त्याने या प्रकल्पाला दिली. एवढी जिद्द, वेळ आणि निष्ठा दाखवत एखाद्या प्रकल्पात स्वतःला झोकून देणे प्रत्येकासाठी शक्य नसते, असेही राजामौली यांनी म्हटले होते.


‘बाहुबली’च्या अभूतपूर्व यशानंतर प्रभासची लोकप्रियता केवळ तेलुगू चित्रपटसृष्टीपुरती मर्यादित राहिली नाही. त्याची ओळख देशभरात निर्माण झाली आणि त्याच्या चाहत्यांची संख्या जगभरात वाढली. दरम्यान, प्रभासचे सध्या अनेक मोठे चित्रपट चर्चेत आहेत. यामध्ये ‘स्पिरिट’ हा त्याचा बहुप्रतीक्षित चित्रपट आहे. याशिवाय हनू राघवपुडी दिग्दर्शित ‘फौजी’ या ऐतिहासिक पार्श्वभूमीवरील ॲक्शनपटातही प्रभास झळकणार आहे.







Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.