गुडघेदुखी








सध्याची लाईफस्टाईल, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव यामुळे लहानांपासून ते मोठ्यांपर्यत उठता-बसता किंवा चालताना हाडांमधून कट-कट असा आवाज येणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. अनेकदा लोक याकडे दुर्लक्ष करतात. परंतु वेळीच काळजी न घेतल्यास भविष्यात सांधेदुखी किंवा आर्थरायटिसचा धोका वाढू शकतो. आज आपण यामागची कारणे आणि सोपे उपाय जाणून घेऊयात.


हाडं वाजण्याची कारणे



  • वयोमानानुसार किंवा पोषक घटकांच्या अभावामुळे सांध्यांतील वंगण सुकते, ज्यामुळे हाडे एकमेकांवर घासली जाऊन आवाज येतो. सांध्यातील वंगण म्हणजे शरीराच्या हाडांच्या सांध्यामध्ये असणारा नैसर्गिक द्रवपदार्थ, जो हाडांना एकमेकांवर घासण्यापासून आणि झिजण्यापासून वाचवतो.

  • शरीरात कॅल्शियम कमी झाल्यास हाडे कमकुवत आणि ठिसूळ होतात. परिणामी हाडांमधून आवाज येऊ लागतो.

  • तासनतास एकाच जागी बसून राहिल्याने सांधे कडक होतात. ज्यामुळे हा त्रास होऊ शकतो.


उपाय



  • दूध, दही, पनीर, तीळ आणि हिरव्या पालेभाज्यांचा दैनंदिन आहारात समावेश करावा.

  • शरीराला नैसर्गिक व्हिटॅमिन D मिळण्यासाठी रोज सकाळी 10 ते 15 मिनिटे कोवळ्या उन्हात बसावे.

  • रात्री भिजवलेले मेथीचे दाणे सकाळी खाल्ल्याने सांध्यांतील सूज व वेदना कमी होतात.

  • गुळ आणि भाजलेले फुटाणे खाल्ल्याने हाडांना ताकद मिळते.

  • सांध्यांमधील वंगण टिकवून ठेवण्यासाठी दिवसभरात 3 ते 4 लिटर पाणी पिणे गरजेचे आहे.

  • हलका फुल्का व्यायाम, योगासन किंवा रोज 30 मिनिटे चालण्याने सांध्याची लवचिकता टिकून राहते.


महत्त्वाचा सल्ला


जर हाडं वाजण्यासोबत तीव्र वेदना किंवा सूज येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


हेही वाचा – कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D ची कमतरता कशी ओळखावी?











Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.