अहिल्यानगर : अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर भाळवणी गावच्या शिवारात हॉटेल संदीपसमोर गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास आयशर टेम्पो आणि वॅगनर कारची भीषण समोरासमोर धडक झाली. या अपघातात (Accident News) वॅगनरमधील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू (Accident News) झाला आहे. मृतांमध्ये शकील शेख, सलमा शेख, ईकबाल शेख आणि सुमैय्या शेख यांचा समावेश आहे. मृत व्यक्ती हे मुंबईच्या मालवणी येथील असल्याची माहिती आहे. याबाबत अल्ताफ शेख यांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शकील शेख हे कुटुंबासह अहिल्यानगर येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी वॅगनर कारमधून येत होते. पहाटे दोनच्या सुमारास भाळवणी (Accident News) शिवारातील हॉटेल संदीपसमोर त्यांच्या कारला आयशर टेम्पोने समोरून जोराची धडक दिली. धडकेनंतर वॅगनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कारमधील प्रवासी गंभीर जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत पडले होते. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी तत्काळ रुग्णवाहिकेला (Accident News) माहिती दिली. त्यानंतर जखमींना पारनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर चौघांनाही मृत घोषित केले. अपघातानंतर आयशर चालक घटनास्थळी थांबला नाही, अशी फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अज्ञात चालकाविरुद्ध पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास करण्यात येत आहे.(Accident News)
अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर भाळवणी शिवारात हॉटेल संदीपसमोर आयशर टेम्पो व कारची समोरासमोर धडक झाली. त्यात कारमधील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. याबाबत अल्ताफ शब्बीर शेख (वय ५२, रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर) यांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुरुवारी रात्री शकील शेख हे येथे कुटुंबासह अहिल्यानगर नातेवाईकांना भेटण्यासाठी कारमधून (एमएच ४७ सीके १३०८) येत होते. पहाटे दोन वाजेच्या सुमारास भाळवणी शिवारातील हॉटेल संदीपसमोर त्यांच्या कारला आयशर टेम्पोची (एमएच १६ सीडी २७४७) समोरून धडक बसली. त्यात कारमधील शकील शेख, सलमा शेख, इकबाल शेख व सुमैय्या शेख हे गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून पारनेर ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र, चौघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सकाळी जाहीर केले.
भंडारा जिल्ह्याच्या लाखनी साकोली तालुक्याच्या पिंपळगाव येथे आयशर आणि ट्रॅक्स गाडीचा अपघात झाला. मृतक हे सर्व छत्तीसगडचे मजूर आहेत, नागपूरच्या दिशेने जात असताना हा भीषण अपघात झाला. छत्तीसगडमधून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅक्सचा भीषण अपघात झाला. या वाहनांमध्ये एकमेव पुरुष चालक आणि सर्व महिला आणि त्यांचे छोटे बालक नागपूरकडे प्रवास करीत होते. या भीषण अपघातात घटनास्थळावर ८ जणांचा मृत्यू झाला होता. या मृतांच्या संख्येत आणखी एक वाढ झाली असून नागपूरला उपचारासाठी नेण्यात येणाऱ्या एका महिलेचा वाटेत मृत्यू झाला. त्यामुळे मृतकांचा आकडा आता ९ वर पोहोचला आहे.
मृतांमध्ये ६ महिला आणि ३ बालकांचा समावेश आहे. ५५ वर्षीय एका महिलेसह मृत पावलेल्या उर्वरित सर्व महिला या ३५ वयोगटातील आहेत. तर, ३ बालक हे सर्व ५ वर्षाखालील आहे. या सर्व अपघातग्रस्त महिला छत्तीसगडमधून नागपूर येथील त्यांच्या माहेरी तिज उत्सवासाठी जात असताना हा भीषण अपघात राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव जवळ पहाटेच्या सुमारास घडला. सोमनाथ वर्मा या व्यक्तीच्या कुटुंबातील आई, बहीण, भाची आणि बहिणीची जाऊबाई अशा चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त वाहनांमध्ये १६ ते १७ जण प्रवास करीत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सध्या भंडारा मेडिकल कॉलेजमध्ये ३ बालकांवर तर उर्वरितांना नागपूर मेडिकल कॉलेजला हलविण्यात आलं आहे. वाहन चालक हा या अपघातात वाचला असून त्याच्यावर भंडारा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार करण्यात येत आहे. मन हेलावरून आणि पिळवटून टाकणारा अपघात घडला असून छोटे बालक यात आपल्या आईला पोरके झाल्याचं विदारक दृश्य भंडाऱ्यात बघायला मिळत आहे. घटनेचा पुढील तपास लाखनी पोलीस करीत आहे.
नांदेड-भोकर मार्गावर गुरुवारी १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान ट्रक आणि पिकअप वाहनात समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. सर्वत्र पोळा साजरा केला जात असताना भोकर तालुक्याला मात्र एका भीषण अपघाताच्या घटनेला सामोरे जावे लागले. आठ जणांच्या मृत्यूने भोकरमध्ये शोककळा पसरली आहे.
पांडुरंग लिंगू वाघमारे, त्यांची पत्नी लक्ष्मीबाई वाघमारे (रा. सईदनगर भोकर), मोबाइल दुरुस्तीचे काम करणारा सय्यद अल्तमेश सय्यद अलीमोद्दीन (रा. बिलालनगर, भोकर), टाटा मॅजिकचा चालक शेख फिरोज (रा. सईदनगर, भोकर), बलवान पवार (रा. पोटा तांडा, ता. हिमायतनगर), शाहीद सौदागर (रा. भोकर), कृष्णा पवार (रा. पोटा तांडा, ता. हिमायतनगर) अशी मृतांची नावे आहेत. मात्र एका मृताची ओळख पटणे बाकी आहे. जखमींमध्ये सोमनाथ मारोती येळणे, शेख रेहान (१६, रा. भोकर), शेख जलील (६०, रा. हिमायतनगर), पिंटु धुर्वे (रा. शेखमुखवाडी नांदेड), रेखा बडगे (४०, रा. नरवट), शेख खलील शेख वहीद, शेख बाबुमिया यांचा समावेश आहे. सर्व जखमींना नांदेडच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.