नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक टॉप -10 अब्जाधीशांच्या यादीवर अमेरिकन उद्योगपतींचं वर्चस्व आहे. टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीत भारतातील मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांचा काही काळ समावेश होता. मात्र, दोन्ही भारतीय उद्योजक यापूर्वीच टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर गेले आहेत. अंबानी आणि अदानी टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर गेल्यानंतर फ्रान्सचे बर्नार्ड अर्नाल्ट यादीत होते. मात्र, ते देखील टॉप -10 अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर गेले आहेत. यावर्षी बर्नार्ड अर्नाल्ट  64.9 अब्ज डॉलर्स गमावले आहेत. सध्या त्यांची नेटवर्थ 143 अब्ज डॉलर्सवर आली आहे. 


टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीतून भारतीय उद्योजक गौतम अदानी आणि मुकेश अंबानी बाहेर गेल्यानंतर बर्नार्ड अर्नाल्ट एलन मस्क यांना मागे टाकत पहिल्या स्थानावर पोहोचले होते. ब्रँड लुई विटानचे मालक अर्नाल्ट टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत सर्व स्थानांवर होते. गुरुवारी त्यांची संपत्ती 1.74 अब्ज डॉलरनं कमी झाली आणि ते 11 व्या स्थानावर पोहोचले. अर्नाल्ट यांच्या कंपनीचे शेअर यावर्षी 36 टक्क्यांनी घसरले आहेत. 


जगातील टॉप 10 अब्जाधीश 


1-ब्लूमबर्ग बिलियनेअर निर्देशांकानुसार टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीत एलन मस्क पहिल्या स्थानी असून यावर्षी त्यांनी 299 अब्ज डॉलर्सची संपत्ती मिळवली आहे. त्यांचं एकूण नेटवर्थ 919 अब्ज डॉलर आहे. 


2-दुसऱ्या स्थानी लॅरी पेज असून त्यांची नेटवर्थ 286 अब्ज डॉलर आहे. यावर्षी त्यांची संपत्ती 17 अब्ज डॉलरनं वाढली आहे. 


3-तिसऱ्या स्थानी  अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आहेत, त्यांची संपत्ती या वर्षी 20.4 अब्ज डॉलरनं वाढली आहे. बेझोस यांची नेटवर्थ 274 अब्ज डॉलर झाली आहे. 


4-चौथ्या स्थानी काबिज सर्गी ब्रिन असून ते देखील अमेरिकेमधील उद्योजक आहेत. ब्रिन यांची संपत्ती 15.9 अब्ज डॉलरनं वाढली असून त्यांची नेटवर्थ 266 अब्ज डॉलवर पोहोचली आहे. 


5-पाचव्या स्थानी मायकल डेल असून यावर्षी त्यांनी 105 अब्ज डॉलर कमावले आहेत.सध्या त्यांची नेटवर्थ 245 अब्ज डॉलर झाली आहे. 


6-सहाव्या स्थानावर मार्क झुकरबर्ग असून त्यांची नेटवर्थ 229 अब्ज डॉलर आहे. झुकरबर्गची नेटवर्थ या वर्षी 4.54 अब्ज डॉलरनं कमी झाली आहे.  


7-लॅरी एलिसन यांनी देखील यावर्षी 39.8 अब्ज डॉलर गमावले आहेत. एलिसन यांची नेटवर्थ 208 अब्ज डॉलर आहे. 


8-जेनसेन हुआंग यांची नेटवर्थ 181 अब्ज डॉलर असून ते आठव्या स्थानावर आहेत. यावर्षी त्यांची नेटवर्थ 26.4 अब्ज डॉलरनं कमी झाली आहे. 


9- नवव्या स्थानावर स्टीव बाल्मर असून त्यांची नेटवर्थ 172 अब्ज डॉलर आहे. बाल्मर यांची नेटवर्थ  3.83 अब्ज डॉलरनं कमी झाली आहे.  


10- अब्जाधीशांच्या यादीत दहाव्या स्थानावर वॉरेन बफेट आहेत. बफेट यांनी नेटवर्थ 144 अब्ज डॉलर आहे. यावर्षी त्यांची संपत्ती 7.23 अब्ज डॉलरनं कमी झाली आहे. 


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.